कोलंबो | गुरुवारी (२ ऑगस्ट) झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताचा श्रीलंकेने पाच गडी राखून पराभव केला.
या सामन्यात श्रीलंकेने भारताचे १९३ धावांचे आव्हान ४५.४ षटकात पाच गडी गमावून पूर्ण केले.
यामध्ये श्रीलंकेचा कर्णधार निपुन धनंजयाने ७ चौकारांच्या सहय्याने नाबाद ९२ धावांची खेळी केली. निपुन धनंजयाला प्रसिंदू सूर्याबांद्राने ५२ धावांची खेळी करत सुरेख साथ दिली.
यापूर्वी भारताने या सामन्यात टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारताच्या चांगलाच अंगलट आला.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत भारताला ४७ षटकात सर्वबाद १९३ धावांवर रोखले.
भारताकडून सलामीवीर पवन शाहने सर्वाधिक ४९ धावा केल्या तर अनुश बोधानीने ३६ धावा करत त्याला साथ दिली.
या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. तर दुसरा सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
या मालिकेतील तिसरा सामना कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट क्लबच्या मैदानावर रविवारी (५ ऑगस्ट) होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज
–‘द वॉल’ राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी