विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याला केवळ १० दिवस राहिले आहेत. अशात क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेट जाणकार भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल वेगवेगळी मते मांडताना दिसत आहेत. कोण सांगत आहेत की, भारतीय संघाने तीन वेगवान गोलंदाजांसोबत खेळावे, तर कोण सांगत आहे ४ वेगवान गोलंदाजांसोबत खेळावे. जर भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ४ वेगवान गोलंदाजांसोबत खेळला, तर पाचव्या गोलंदाजाच्या रुपात फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली या दोघांपैकी कोणाला संधी देतील हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कानेरिया याने अश्विन आणि जडेजापैकी एकाचे नाव सांगितले आहे. त्या खेळाडूला अंतिम सामन्यात बाहेर बसवून चालणार नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. तो खेळाडू म्हणजे ‘रवींद्र जडेजा’.
जडेजा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला अंतिम सामन्यात बाहेर बसवू शकत नाही. तो एक थ्रीडी खेळाडू आहे, जो कधीही सामन्याचे स्वरूप बदलू शकतो, असे दानिशचे म्हणणे आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना दानिश म्हणतो की, “संघ जर कठीण परिस्थिती असेल तर, जडेजा गोलंदाजीमध्ये कधीही महत्वपूर्ण विकेट काढून देऊ शकतो. तसेच, खालच्या फळीत फलंदाजी करून ताबडतोड धावा उभारू शकतो. क्षेत्ररक्षणाबाबतीत सध्या जडेजाचा हात कोणीही पकडू शकत. म्हणून भारतीय संघात जडेजाचे खेळणे महत्वपूर्ण ठरू शकते.”
जडेजाची इंग्लंडमधील आकडेवारी नेहमीच चांगली राहिली आहे. इंग्लंडमध्ये खेळलेल्या कसोटी मालिकेत ५ सामन्यात १६ विकेट्स आणि २७६ धावांची कामगिरी त्याने केली आहे. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे आणि जडेजाचा न्यूझीलंडविरुद्ध विक्रम खूपच चांगला आहे. आजवर न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या प्रत्येक सामन्यात जडेजाने मोलाची कामगिरी केली आहे.
दानिश कानेरियाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने पाकिस्तान संघाकडून ६१ कसोटी सामने आणि १९ एकदिवसीय सामने खेळले होते. दरम्यान त्याने कसोटीत २६१ विकेट घेतले आहेत आणि एकदिवसय सामन्यात १५ विकेट घेतल्या होत्या.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान साउथम्पटन येथे होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघामध्ये हा महत्त्वपुर्ण सामना खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी ऑसी दिग्गजाने निवडले जगातील ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बुमराहला नाही दिली जागा
संधीची प्रतिक्षा! इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळालेला गोलंदाज म्हणतोय, ‘आता श्रीलंका दौऱ्याची आस’
रहाणेच्या चपळ क्षेत्ररक्षणामागे चक्क मुंबई लोकलचा हात, स्वत: उपकर्णधारानेच केला होता गौप्यस्फोट