टी20 मध्ये कोणताही विक्रम कधी तुटणार याचा काही नेम नाही. हा फाॅरमॅट असा आहे की, ज्यामध्ये अनेक विक्रम अनेकवेळा ब्रेक झालेले दिसतात. यावेळी टी20 विश्वचषकाच्या पात्रता फेरींमधील होत असलेल्या सामन्यात, सामोआचा फलंदाज डॅरियस व्हिसरने जागतिक विक्रम रचला आहे. खरं तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकदा नव्हे तर 5 वेळा एका षटकात 36 धावा झाल्या आहेत. परंतु एका षटकात एकूण 39 धावा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकाच षटकात 6 षटकारही मारले गेले आणि एक नवा विश्वविक्रम नोंदवला गेला. जो आतापर्यंत भारतीय फलंदाज युवराज सिंग, वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड, नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी, भारताचा रोहित शर्मा/रिंकू सिंग आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज यांच्या नावावर आहे. मात्र, आता टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सामोआचा फलंदाज डॅरियस व्हिसरच्या नावावर नोंदवला गेला आहे.
Darius Visser of Samoa breaks the record for most runs scored in an over, previously held by Yuvraj Singh (36 runs) during the 2007 T20 World Cup. 🙌
Visser smashed 39 runs off Nalin Nipiko in the match between Samoa and Vanuatu during the ICC Men’s T20 World Cup Sub Regional… pic.twitter.com/7RE6I8OATV
— CricTracker (@Cricketracker) August 20, 2024
खरं तर, सामोआचा फलंदाज डॅरियस व्हिसरने वानुआतुविरुद्ध एकाच षटकात 39 धावा केल्या. ज्यात 6 षटकारांचा समावेश होता. मात्र, हे षटकार सलग नसून एकाच षटकात नक्कीच आले. एकूण तीन चेंडू नो बॉल होते. अशाप्रकारे एका षटकात 39 धावा झाल्या, हा विश्वविक्रम आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एका षटकात 39 धावा झाल्या नाहीत. डॅरियस व्हिसरने नलिन निपिकोविरुद्ध स्फोटक फलंदाजी केली. डॅरियस व्हिसरनेही आपल्या संघासाठी शतक झळकावून जागतिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला.
डॅरियस व्हिसरने वानुआतुचा गोलंदाज नलिन निपिकोविरुद्ध डावाच्या 15व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. चौथा चेंडू नो बॉल होता, ज्यावर एकही धाव झाली नाही. पुढच्या चेंडूवर डॅरियस व्हिसरने पुन्हा षटकार ठोकला. पाचवा चेंडू ओव्हरचा डॉट होता, पण पुढच्या चेंडूवर डॅरियस व्हिसरने पुन्हा षटकार ठोकला. मात्र, हा चेंडू नो बॉल होता आणि पुन्हा जेव्हा निपिकोने शेवटचा चेंडू टाकला तेव्हा डॅरियस व्हिसरने आणखी एक षटकार ठोकला. अशाप्रकारे या षटकात एकूण 6 षटकार मारले गेले आणि नो बॉल म्हणून तीन धावा झाल्या. अशा प्रकारे एकाच षटकात एकूण 39 धावा झाल्या.
हेही वाचा-
चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, स्टार खेळाडूने 48 चेंडूत ठोकल्या तब्बल 124 धावाॉ
आता गौतम गंभीरची जागा झहीर खान घेणार? अहवालात मोठा खुलासा
कोलकाता प्रकरणावरून सौरव गांगुलीचा चढला पारा, पोस्ट व्हायरल