---Advertisement---

आयसीसीचे सीईओ देणार २०१८ एमसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट व्याख्यान

On: शनिवार, जून 23, 2018 11:14 AM
---Advertisement---

मेरीलिबोन क्रिकेट क्लब स्पिरीट ऑफ क्रिकेट 2018चे व्याख्यान आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन देणार आहेत.

हे व्याख्यान 6 ऑगस्ट 2018 रोजी लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.

दक्षिण अफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू असलेले डेव्हि़ड रिचर्डसन 2012 पासून आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.

याबरोबरच एमसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट व्याख्यान देणारे ते दुसरे दक्षिण अफ्रिकन खेळाडू बनणार आहेत. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेच्या बॅरी रिचर्ड्स यांनी 2002 साली एमसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट व्याख्यान दिले होते.

लॉर्ड कॉवड्रे ऑफ टोनब्रिज यांच्या स्मरणार्थ 2001 पासून एमसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट व्याख्यान दिले जाते. या व्याख्यानात क्रिकेट संबंधी विविध विषयावर चर्चा केली जाते.

यापूर्वी एमसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट व्याख्यान मालिकेत रिची बेनॉर्ड, क्लाइव लॉयड, सर इयान बॉथम, कुमार संगाकारा आणि गेल्या वर्षी ब्रायन लारा यांनी व्याख्यान दिले आहे.

एमसीसीचे मानद सदस्य असलेल्या डेव्हीड रिचर्डसन यांनी दक्षिण आफ्रिकेकडू 42 कसोटी सामन्यात 1359 धावा आणि 150 पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत. तर 122 एकदिवसीय सामन्यात त्यांनी 868 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Video: रशीद खानच्या भावाची गोलंदाजी पाहिली का?

धोनीबाबत आणखी एका यष्टीरक्षकाचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment