एम एस धोनी (MS Dhoni) हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वातच भारताने 2007मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर 2011 मधील वनडे विश्वचषक आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
धोनी जरी भारताला लाभवेला सर्वात यशस्वी कर्णधार असला तरीही त्याने देखील सिनीयर व ज्युनियर कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली क्रिकेट खेळले आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तो 6 भारतीय कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली खेळला. यातील सौरव गांगुली, राहुल द्रविड (Rahul Dravid) व अनिल कुंबळे ही नाव बहुतांश चाहत्यांना माहित आहेत. तसेच विराट कोहली (Virat Kohli) व रोहित शर्मा (Rohit Sharma) या युवा कर्णधारांच्या नेतृत्त्वाखालीही धोनी क्रिकेट खेळला आहे. आजच्या या लेखात त्या 3 कर्णधारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या नेतृत्वात धोनीने आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
१. विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
कर्णधार म्हणून सेहवागने 17 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे नेतृत्त्व केले. यातील ४ वनडे सामने धोनीने त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळले असून त्यात धोनीने 55.33 च्या उत्कृष्ट सरासरीने त्याने एकूण 166 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 94.31 होता. सेहवागच्या नेतृत्वात भारतीय संघासाठी धोनीने 1 अर्धशतकही केले.
वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एमएस धोनीने एक टी-20 सामनाही खेळला. या सामन्यात एमएस धोनी शून्यावर बाद झाला. तो सामना भारतीय संघाने जिंकला. विशेष म्हणजे भारतीय संघाचा तो सामना पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. विरेंद्र सेहवागला कधीही नियमितपणे भारतीय संघाचा कर्णधार बनवले गेले नाही. त्याला फक्त पार्ट टाइम भारतीय संघाच कर्णधारपद मिळायचं.
२. अनिल कुंबळे (Anil Kumble)
अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली एमएस धोनीने एकूण 10 सामने खेळाले आहेत. त्याच्या नेतृत्वात एमएस धोनीने भारतीय संघासाठी 26.86 च्या सरासरीने 403 धावा केल्या आहेत. कुंबळेच्या नेतृत्वात धोनीने भारतीय संघासाठी 3 अर्धशतकेही केली. त्याचबरोबर धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये 46 चौकार आणि 4 षटकारही ठोकले.
अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतरच एमएस धोनीला भारतीय कसोटी संघाचे कर्णधार पद देण्यात आले. त्याआधी धोनी फक्त वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधार पद सांभाळत होता.
३. माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene)
एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माहेला जयवर्धनेच्या नेतृत्वातही खेळला आहे. धोनी आशिया इलेव्हनच्या संघाकडून खेळत असताना माहेला जयवर्धने कर्णधार होता. 2007 मध्ये धोनीने माहेला जयवर्धनेच्या नेतृत्वात एकूण 3 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 87 च्या उत्कृष्ट सरासरीने 174 धावा केल्या. या वेळी त्याचा 125.17 चा स्ट्राइक रेट होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी शिखर धवन कर्णधार! चाहते नाराज, बीसीसीआयला केलं ट्रोल
रणजी ट्रॉफी गाजवणारा ‘तो’ खेळाडू टीम इंडियामध्ये यायलाच हवा, भारतीय दिग्गजाने केली मागणी