केरळ रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार सचिन बेबी विरुद्ध, त्याच्याच संघ सहकाऱ्यांनी बंड केले आहे.
केरळ संघातील तेरा खेळाडूंनी केरळ क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून 2018-19 ची रणजी ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी नविन कर्णधार नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
या पत्रामध्ये केरळ संघाच्या तेरा खेळाडूंनी कर्णधार सचिन बेबीच्या, संघ सहकाऱ्यांशी असभ्य वर्तणूकीबद्दल तक्रार केली आहे.
“तो स्वार्थी आणि गर्विष्ठ स्वभावाचा आहे. तो संघातील इतर खेळाडूंबरोबर हुकूमशाही पद्धतीने वागतो. जेव्हा संघ जिंकतो तेव्हा तो श्रेय घेतो आणि जेव्हा संघ हरतो तेव्हा तो खेळाडूंना दोष देतो. यामुळे सर्व संघ सदस्य डिस्टर्ब आहेत. तसेच तो खेळाडूंच्या पाठीमागे सतत काहीही बोलत असतो. त्यामुळे संघातील खेळाडुंचे त्यांच्या खेळावरचे लक्ष उडत आहे.” असे केरळ संघातील खेळाडूंनी केरळ क्रिकेट असोसिएशनला पत्रात लिहले आहे.
2017-2018 च्या रणजी ट्रॉफीमध्ये केरळ संघ सचिन बेबीच्या नेतृत्वाखाली प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहचला होता.
केरळ क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रश्नावर सर्व खेळाडूंशी बोलून निर्णय घेतला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-लकी सॉंग- इम्रान खान यांनी पुन्हा एेकले १९९२ च्या विश्वचषकाचे थीम सॉंग, नव्या इनिंगसाठी सज्ज
-ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू थोडक्यात बाचावला, दारुच्या नशेत गमावला असता जीव
-केवळ काही तासांच्या फरकाने भारतीय संघ खेळणार दोन वनडे सामने