डिसेंबर 2023 पासून कसोटी क्रिकेटबद्दलच्या भविष्याविषयी सर्वत्र चर्चा होत आहे. कसोटी क्रिकेट विषयी चिंता व्यक्त केली जात आहे. यामागे अनेक कारणे आहेत. केवळ दोन दोन सामन्यांची कसोटी मालिका, कसोटीत सिनियर खेळाडूंची कमी, इतर ठिकाणांच्या लीगसाठी कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेणे असे काही बाबी मागील काही महिन्यांपासून होत आहे. अनेक माजी क्रिकेटर्सने कसोटी क्रिकेट अडचणीत आहे आणि आपल्या पद्धतीने कसोटी क्रिकेट वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातचं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापक रॉबने फॉर्मूला सांगितला आहे.
रॉबने कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी एक जबरदस्त उपाय सांगितला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, कसोटी क्रिकेटसाठी एक विशिष्ट वेळ निश्चित केला पाहिजे.यामध्ये केवळ कसोटी क्रिकेटचं खेळायसा पाहिजे. त्याने असंही म्हणले आहे की, ज्यावेळेस हे सामने चालू असतील त्यावेळेस जगात कोठेही व्हाइट बॉल टूर्नामेंट होणार नाही.
रॉबचा कसोटी क्रिकेट वाचवण्याचा फॉर्मूला
रॉबने एका माध्यमावर सांगितले की, “कसोटी क्रिकेटला एक निश्चित वेळेची गरज आहे. जसं आईपीएलसाठी एक वेळ आहे, व्हाइट बॉल टूर्नामेंट होत आहेत तसेच कसोटी क्रिकेटसाठी पण एक निश्चित वेळेची गरज आहे आणि हा सामना होत असताना इतर फॉर्मेटच्या क्रिकेटवर प्रतिबंध हवा. इंग्लंंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या क्रिकेट बोर्डने लक्ष द्यायला हवे. तसेच आयसीसी पण इतर देशांवर लक्ष दिले पाहिजे.” पुढे सांगत,
“कसोटी क्रिकेटसाठी आपल्याला थोडा अहंकार पण सोडायला हवे. आपले असं म्हणणे आहे की, जोपर्यंत एखादा खेळाडू 150 व्हाइट चेंडूतील सामने खेळत नाही तोपर्यंत कसोटी क्रिकेट खेळू शकत नाही. असे नाही झाले पाहिजे. असे असले पाहिजे की, जो खेळाडू चांगली कामगिरी करेन त्याला रेड बॉल क्रिकेटमध्ये स्थान दिले पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या
‘मी सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही…’, रोहित शर्माचे टी20 विश्वचषक संघ निवडीबाबत मोठे विधान