West Indies First Test Against Australia: ऍडीलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 10 विकेट्स राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघासमोर विजयासाठी केवळ 26 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी एकही विकेट न गमावता सहज गाठले. जोश हेझलवूड याला त्याच्या जबरदस्त गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. अशा प्रकारे कांगारू संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र असेल आणि 25 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाईल.
वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात 188 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्यांच्या तीन खेळाडूंने पदार्पण केले, त्यापैकी शामर जोसेफ (Shamar Joseph) याने 36 धावांची खेळी केली. याशिवाय अनुभवी फलंदाज कर्क मॅकेन्झी (Kirk McKenzie) यानेही 50 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड याने प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. (australia vs west indies 1st adelaide test match report josh hazlewood sets new record)
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 283 धावा केल्या आणि 95 धावांची चांगली आघाडी घेतली. एकेकाळी संघ अडचणीत असताना मधल्या फळीत ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याने 119 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला आघाडी मिळवून दिली. वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफ याने पदार्पणाच्या सामन्यातच पाच विकेट्स घेत एक मोठा विक्रम केला. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या कॅरेबियन संघाला फारशी टक्कर देता आली नाही आणि ते केवळ 120 धावांपर्यंतच मर्यादित राहिले. कर्क मॅकेन्झीने पुन्हा एकदा संघासाठी सर्वाधिक 26 धावा केल्या पण बाकीचे फलंदाज फ्लॉप ठरले.
जोश हेझलवूड याने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी अप्रतिम गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे यजमान संघाला विजयासाठी 26 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी सहज गाठले. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) 11 धावांवर नाबाद राहिला आणि मार्नस लॅबुशेन 1 धावावर नाबाद राहिला. उस्मान ख्वाजा 9 धावा करून रिटायर्ड हट झाला. (AUS vs WI Australia thrash West Indies by 10 wickets in 1st Test RCB skipper wreaks havoc)
हेही वाचा
मोठी बातमी: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ, मिकी आर्थरसह दोन सपोर्ट स्टाफचा तडकाफडकी राजीनामा
अफगाणिस्तानविरुद्ध मारलेल्या ‘त्या’ षटकारामागे रोहितचा दोन वर्षांचा सराव! कर्णधाराने स्वतः दिली कबुली