वेलिंग्टन | बुधवारी (25 जुलै) पाकिस्तान विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाची निवड झाली आहे.
न्यूझीलंड संघामध्ये भारतीय वंशाचा युवा फिरकीपटू एजाज पटेलला स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्याती ही मालिका यूएई मध्ये ऑक्टोबर मध्ये होणार आहे.
यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून भारतीय वंशाचे दीपक पटेल, जितन पटेल, इश सोधी, रॉनी हिरा, तरुण नेथुला आणि जित रावल हे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.
यापैकी सध्या इश सोधी न्यूझीलंड संघाचा नियमित सदस्य आहे.
एजाज पटेलचा 1988 साली मुंबई येथे जन्म झाला होता.
एजाज पटेलने न्यूझीलंडमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2015 साली पदार्पण केले आहे. 2015-16 च्या प्लंकेट शिल्ड चषकात त्याने 43 बळी मिळवले होते. तर 2016-17 च्या मोसमात 9 सामन्यात 44 बळी घेतले होते.
एजाज पटेल प्लंकेट शिल्ड चषकाच्या 2015-16 आणि 2016-17 या दोन्ही मोसमात सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-माजी कर्णधार सौरव गांगुलीची आर अश्विनसाठी बॅटिंग
-माझ्या आयुष्यासाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजीसाठी निवडेल- राहुल द्रविड