इंग्लंड क्रिकेटसाठी सध्या चांगले दिवस सुरू आहेत.इंग्लंड पुरूष संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारत विश्वविक्रम केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच इंग्लंड महिला क्रिकेट संघाने आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
बुधवार दि. 20 जूनला महिला इंग्लड संघाने टी-20 क्रिकेटमध्ये विक्रमी 250 अशी धावसंख्या उभारली आहे.
इंग्लंडमध्ये होत असलेल्या इंग्लंड, न्युझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिरंगी मालिकेत बुधवारी झालेल्या टी-20 सामन्यात इंग्लडने 20 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात महिला क्रिकेटमधील 250 अशी सर्वोंच्च धावसंख्या उभारली.
यामध्ये इंग्लंड संघाची कर्णधार टॅमी बेमॉन्टने 52 बॉलमध्ये 116 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये 18 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिका महिला संघ 20 षटकात 6 बाद 129 धावांपर्यंत मजल मारू शकला.
यापूर्वी इंग्लडच्या पुरूष क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध मंगळवार दि.19 जूनला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोंच्च अशी 481 धावसंख्या उभारली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–त्या लोकांना पाहुन कॅप्टन कुल धोनी म्हणाला; भनक लागली वाटतं!
–चक्क वनडेत फाॅलो-आॅन??? आॅस्ट्रेलियन संघाची सोशल मीडियावर चेष्टा!