मुंबई । भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद हे पुन्हा चर्चेत आले आहेत. प्रसाद यांनी नुकतेच भारताचा टी-20 आणि कसोटी संघ निवडला आहे. विशेष बाब म्हणजे प्रसाद यांनी आपल्या संघात महेंद्रसिंग धोनीला स्थान दिले नाही तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला बारावा खेळाडू म्हणून निवडले आहे.
प्रसाद यांच्यानंतर माजी खेळाडू किरण मोरे आणि अजित आगरकर यांनीही टी-20 आणि कसोटी संघ निवडला आहे. संघ निवडताना एक अट अशी होते की, एकाच दिवशी कसोटी आणि टी- 20 सामने असून त्याप्रमाणे खेळाडूंची निवड करायची.
एमएसके प्रसाद यांनी कसोटी संघ
एमएसके प्रसाद यांनी कसोटी संघात रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमान विहारी यांना संधी दिली. यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमान साहा यांची निवड केली. गोलंदाजीची जबाबदारी रवींद्र जडेजा, आर अश्विन, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर सोपवली तर मोहम्मद शमीला बारावा खेळाडू म्हणून निवडले.
एमएसके प्रसाद यांचा टी-20 संघ –
केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी.
किरण मोरे यांचा कसोटी संघ –
रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि हनुमा विहारी.
किरण मोरे यांचा टी-20 –
शिखर धन, केएल राहुल, संजू सैमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि सूर्याकुमार यादव
अजीत अगरकर यांचा कसोटी संघ –
पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि शुभमन गिल.
अजीत अगरकर यांचा टी20 संघ –
रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकुर.