टी२० विश्वचषक २०२१ ची रविवारपासून (१७ ऑक्टोबर) सुरुवात होते आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने टी२० विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ करणार आहे. दुबई येथे २४ ऑक्टोबर रोजी हा सामना रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघांमधील सामना म्हटलं की, खेळाडूंबरोबरच चाहत्यांच्याही भावना उमडून येतात. अशात पराभवानंतर खेळाडूंचे पोस्टर जाळणे, त्यांच्यावर पातळी सोडून टीका करणे, असे प्रकार घडताना दिसतात.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी२० विश्वचषकाची लढत होण्यापूर्वीही असा काहीसा प्रकार घडला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला या सामन्यापूर्वी धमकी मिळाली आहे.
टी२० विश्वचषक मोहिमेसाठी पाकिस्तान संघाने युएईला उड्डाण भरली आहे. १५ ऑक्टोबर रोजी हा संघ पाकिस्तानहून युएईला जाण्यासाठी निघाला होता. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार आझम याने संघाचा उड्डाण भरण्यापूर्वीचा फोटो ट्वीटरवर पोस्ट केला होता. यावेळी त्याने पाकिस्तानी चाहत्यांकडून पाठिब्यांची अपेक्षा केली होती.
‘आम्ही युएईसाठी निघतोय. तुमचे समर्थन हेच आमच्यासाठी सर्वकाही आहे. आमच्या पाठीशी उभे राहा. आम्हाला समर्थन करत राहा. आमच्यावरील विश्वास कायम राहुद्या आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करा,’ असे आझमने पोस्टवर लिहिले होते.
परंतु त्याच्या या पोस्टखाली काही चाहत्यांनी अनपेक्षित अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातही एका चाहत्याने तर त्याला सरळ सरळ धमकीवजा प्रतिक्रिया दिली आहे. त्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, ‘पाकिस्तान संघाला २४ ऑक्टोबर रोजीचा सामना जिंकवून दे. नाहीतर तुला घरी येऊ दिले जाणार नाही.’
https://twitter.com/RahilBashir_/status/1448897190810718212?s=20
चाहत्याच्या या धमकीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. घडल्या प्रकारासह पाकिस्तानचा कर्णधार आझमचीही चिंता वाढली असावी. कारण टी२० विश्वचषकातील आकडेवारी पाहता, पाकिस्तानपुढे भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषकात ५ सामने झाले आहेत. या सर्व सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शास्त्रींपेक्षा जास्त पगार ते भारतीय संघाहून अधिक जबाबदारी, द्रविडसाठी बीसीसीआयची मोठी योजना
Photo: नाही चालली कोणतीही हुशारी, टी२० विश्वचषकाच्या नव्या जर्सीवर पाकिस्तानने लिहिले भारताचे नाव