इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच ३० मे हा दिवस प्रत्येक क्रिकेट चाहत्याचा स्मरणार्थ असेल. हा तोच दिवस आहे ज्यादिवशी २०१४ साली चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (आताचे नाव पंजाब किंग्स) या दोन्ही संघात चाहत्यांना हाय वोल्टेज सामना पाहायला मिळाला होता. एकीकडे सुरेश रैनाने अवघ्या २५ चेंडूत ८७ धावांची खेळी करत पंजाब संघातील गोलंदाजांचा घाम काढला होता. तर दुसरीकडे वीरेंद्र सेहवागने १२२ धावांची शतकी खेळी करत मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता.
इंडियन प्रीमियर लीग २०१४ मध्ये ३० मे रोजी झालेल्या प्लेऑफच्या दुसऱ्या क्वालिफायरच्या सामन्यात चेन्नई आणि पंजाब हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात वीरेंद्र सेहवागच्या वादळी शतकी खेळीमुळे पंजाब संघाला २० षटकांअखेर २२६ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. अवघ्या १ धावांवर चेन्नईने आपला पहिला गडी गमावला होता. पण, त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सुरेश रैनाने पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केले होते. त्याने अवघ्या २५ चेंडूत ८७ धावांची खेळी केली होती.
परविंदर अवानावर हल्लाबोल
चेन्नई संघाला सुरुवातीलाच झटका बसल्यानंतर सुरेश रैनावर चेन्नईचे आव्हान टिकवून ठेवण्याची जबाबदारी आली होती. त्याने पावरप्लेच्या षटकात पंजाबकडून खेळताना गोलंदाज परविंदर अवानाला आपले शिकार बनवले होते. त्याने परविंदर अवानाच्या एकाच षटकात तब्बल ७ चेंडू सीमापार केले होते.
पहिल्या आणि दुसऱ्या चेंडुवर त्याने अनुक्रमे मिडविकेट आणि लॉंग ऑनच्यावरून षटकार लागावले होते. तिसऱ्या चेंडूवर त्याने मिडविकेटच्या दिशेने चौकार लगावला होता. तर चौथ्या चेंडूवर त्याने स्केवर लेगच्या दिशेने चौकार लगावला होता. त्यानंतर अवानाने नो बॉल फेकला होता, त्या चेंडूवरही रैनाने थर्ड मॅनवरून चौकार लगावला होता. त्यानंतर पाचव्या चेंडूवर रैनाने मिड ऑनच्या दिशेने चौकार मारला होता. तसेच शेवटच्या चेंडूवर ही रैनाने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार लगावला होता. या षटकात त्याने तब्बल ३३ धावा ठोकल्या होत्या.
या सामन्याच्या आठवणी चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केल्या आहेत.
चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रीया
On This Day In 2014! 💛
Suresh Raina @ImRaina🏏
Playing The Best Innings Of @IPL History.This Was Best Ever Innings Seen In T20 !
CSK vs KXIP ! CSK Lose The Match But Raina Won The Millions Of Hearts !
87 Runs
25 Balls
Fours -12
Sixes – 6
SR – 348.0#SureshRaina #ChinnaThala pic.twitter.com/PhYa92FfRA— Mohan Krish (@Unluckmohan_3) May 30, 2021
https://t.co/puC0HB44SO Suresh Raina 87 of 25
vs KXIP https://t.co/tuUjH0W7Om— AmazingMoments (@AmazingMoment14) May 30, 2021
On this day in 2014,
One of the magnificanent knock in IPL history. #CSK vs KXlP
👑 Mr. IPL "Chinna Thala" – #SureshRaina 💛💛💛 87(25). 🔥#Yellove #Valimai #WhistlePodu pic.twitter.com/DEuB0KXrtL— RamVignesh (@RamVignesh_3_AK) May 30, 2021
This day will always be remembered for Viru Paaji's Charismatic knock of 122 and #SureshRaina 's heroic knock of 87. #Sehwag #IPL pic.twitter.com/wukvdZhMyU
— आशुतोष भारतीय Ashutosh Indian 🇮🇳 (@_AshuTweets_) May 30, 2021
87 off 25 balls!!! WHOA Woww!!!#ChinnaThala is absolutely #WhistlePodu #7YearsOfRainaCarnage 💛🏏 | #SureshRaina | #CSK
Vid courtesy: @Unluckmohan_3
— Sridhar_FlashCric (@SridharBhamidi) May 30, 2021
सहाव्या षटकातच, चेन्नईने १०० धावांचा आकडा पार केला होता. रैनाने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर त्याने अवघ्या २५ चेंडूत ८७ धावांची खेळी केली होती. यात त्याने १२ चौकार आणि ६ षटकार लगावले होते. परंतु चेन्नई सुपर किंग्स संघाला हा सामना जिंकण्यात अपयश आले होते. चेन्नईकडून नंतर केवळ एमएस धोनीने ३१ चेंडूत नाबद ४२ धावांची खेळी केली पण अन्य फलंदाज फार काही करु शकले नाहीत. त्यामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात आले, तर पंजाब अंतिम सामन्यात पोहचला होता. अंतिम सामन्यात पंजाबला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे जडेजा अन्य खेळाडूंपेक्षा क्षेत्ररक्षणात आहे सरस, स्वत:च केलाय खुलासा
वेलकम होम डॅडी! वॉर्नरच्या लाडक्या लेकींनी जवळपास २ महिन्यांनी भेटलेल्या ‘बाबा’चे केले खास स्वागत
” जास्त हिरो बनू नकोस”, नवदीप सैनीने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी केले ट्रोल