सचिन तेंडूलकर आणि ब्रायन लारा यांना १९ च्या दशकातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. भारताचा माजी क्रिकेटपटू तेंडूलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू लारा यांची विकेट कोणत्याही गोलंदाजासाठी स्वप्नवत असते. या दिग्गज फलंदाजांना गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाज ब्रेट लीने त्यांच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आईसीसी) बोलताना ब्रेट ली म्हणाला की, “लारा आणि तेंडूलकर हे जगातील महान खेळाडू आहेत. सचिनच्या कोणत्या क्षणी कशाप्रकारची फटकेबाजी करेल हे मी जाणून असायचो. परंतु, लाराचे तसे नव्हते. लारा कधी कुठला फटका मारेल हे ओळखणे कठीण जायचे.”
ब्रेट ली पुढे म्हणाला कि, “जेव्हापासून माझी क्रिकेट कारकिर्द सुरु झाली. तेव्हापासून सचिन आणि लारा हे दोघेही माझे कसोटीचे आवडते फलंदाज राहिले. लाराची फलंदाजी इतकी आक्रमक होती की, सहा चेंडूत सहा वेळा कुठला फटका मारेल हे कळत नसे. परंतु, तेंडूलकरला यष्टीच्या बाजूला गोलंदाजी केल्यास तो ‘एक्स्ट्रा कवरला’ फटका मारणार, पायावर चेंडू टाकल्यास ‘लेग साइडला’ फटका मारणार आणि सरळ ऑफ यष्टीवर चेंडू टाकल्यास सचिन मला ‘कट शॉट’ मारणार हे निश्चितच होते.”
“त्यामुळे या दोघांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हे दोन्ही खेळाडू माझ्यासाठी महान होते. तसेच तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यात पटाईत होते. सचिनकडे एके अद्भुत फलंदाजीचे तंत्र होते आणि सचिन शांत स्वभाव आणि सुंदर क्रिकेटचे विचार करणारा व्यक्ती होता,” असे त्याने पुढे सांगितले.
सचिन आणि ब्रेट ली या दोघांनी क्रिकेट कारकिर्दीदरम्यान खूपवेळा एकमेकांचा सामना केला होता. सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर सर्वात जास्त कोणी बाद केले असेल, तर तो ब्रेट लीच होता. ब्रेट लीने सचिनला एकूण १४ वेळा बाद केले होता. ब्रेट लीने ब्रायन लारा समोर सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. ब्रेट लीने लाराला एकदिवसीय सामन्यात ५ वेळा तर कसोटी सामन्यात २ वेळा बाद केले होते.
ब्रेट लीने २२१ एकदिवसीय सामने खेळले होते आणि त्यात ३८० गडी बाद केले होते. कसोटीत ७६ सामन्यात ३१० गडी बाद केले होते आणि २५ टी-२० सामन्यात २८ गडी बाद केले होते. ब्रेट ली ऑस्ट्रेलिया आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला आणखी दोन विश्वचषक खेळायचे आहेत,’ दिग्गज भारतीय यष्टीरक्षकाचा आशावाद
“सर्फराझची नेतृत्वशैली कोहलीप्रमाणे; धोनीपेक्षा अतिशय भिन्न”, चेन्नईच्या शिलेदाराने केले विश्लेषण
ओळखलंच नाही राव! कोहली ते वॉर्नरसारखे दिसणारे व्यक्ती तुम्हालाही टाकतील गोंधळात; दिसतात जुळे भाऊ