क्रिकेट विश्वात बरेच खेळाडू स्वभावाने खूप निस्वार्थी आहेत. खरं तर अशा खेळाडूंना शोधणे फार अवघड आहे. परंतु असे काही खेळाडू आहेत जे स्वतःचा स्वार्थ शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते त्यांच्या सहकारी खेळाडूंच यश हे आपलं यश मानून समाधान मानतात.
भारतीय क्रिकेट संघातही असे काही खेळाडू आहेत जे स्वार्थापासून दूर राहतात, त्यापैकी एक सुरेश रैना. त्याने बराच काळ भारतीय संघातील मधल्या फळीत मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत १८ कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत २६.४८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत. तर वनडेत ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. टी२०मध्ये त्याने २९.१८ च्या सरासरीने १६०५ धावा केल्या आहेत.
सुरेश रैना सतत १० वर्षे भारतीय संघात खेळत राहिला आणि त्याने उत्तम योगदान दिले. सुरेश रैना आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीशिवाय कारकीर्दीत या चार मोठ्या गोष्टींमुळे निस्वार्थ खेळाडू मानला जाऊ शकतो.
या चार कारणांमुळे सुरेश रैना नि:स्वार्थ खेळाडू मानला जाऊ शकतो
संघासाठी कोणतीही क्रमांकावर खेळण्यास सज्ज
२००५-०६ मध्ये सुरेश रैनाने भारतीय क्रिकेट संघातून पदार्पण केले. त्यानंतर तो बरीच वर्ष खेळला. सुरेश रैना सुरवातीला मधल्या फळीत फलंदाजी करायचा. पण हळूहळू संघात त्याने स्वत: चे स्थान निश्चित केल्यानंतर त्याने परिस्तिथिनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी केली.
संघाच्या गरजेनुसार रैनाने तिसर्या क्रमांकापासून सातव्या क्रमांपर्यंत फलंदाजी केली. यात तो संघाला मदत करण्यासाठी प्रत्येक वेळी पुढे होता आणि कधीही कोणत्याही क्रमांकावर खेळण्यापासून मागे हटला नाही.
रिषभ पंतचे केले कौतुक
आयपीएल २०१७ मध्ये गुजरात लायन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात झालेल्या सामन्यात जे भावनिक दृश्य पाहायला मिळाले ते क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळते.
त्या सामन्यात रैना कर्णधार असलेल्या गुजरात लायन्सविरूद्ध रीषभ पंतने स्वतःच्या जोरावर दिल्लीला जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. पण शेवटी पंत बाद झाल्यावर प्रतिस्पर्धी असूनही, सुरेश रैनाने स्वतःच त्याच्याकडे जाऊन त्याने धैर्याने केलेल्या कामगिरीचे कौतुक करत प्रोत्साहन दिले. या गोष्टीवरून हे सिद्ध केले की रैना खरंच एक वेगळा खेळाडू आहे आणि खिलाडूवृत्ती जपणारा खेळाडू आहे.
विराट कोहलीचे झाले शतक आणि आनंद रैनाने साजरा केला
भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत असताना सुरेश रैना बरेच वर्ष विराट कोहलीबरोबरही खेळला. विराट कोहलीबरोबर खेळताना रैनाची दाखवलेली खिलाडूवृत्ती दिसून आली एका सामन्यात हे दृश्य दिसले. २०१५ च्या विश्वचषक सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त शतक ठोकले होते. कोहलीने हे शतक केले तेव्हा सुरेश रैना त्याच्याबरोबर मैदानात फलंदाजी करत होता.
जशा कोहलीने १०० धावा पूर्ण केल्या तर रैनाने हात उंचावला आणि त्याच्यासमोर आनंद साजरा करण्यास सुरवात केली.
करतो आपल्या सहकारी खेळाडूच्या कामगिरीचे अभिनंदन
सुरेश रैना आपल्या कारकीर्दीत भारतीय संघातील अनेक खेळाडूंसोबत खेळला आहे. रैनाने स्वत: भारताकडून खेळताना चमकदार कामगिरी बजावली, परंतु तो आपल्या सहकारी खेळाडूच्या कामगिरीचे अभिनंदन करण्यास नेहमीच तयार असतो.
सुरेश रैनाने बर्याच वेळा असे दाखवून दिले आहे की, तो ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असेल, त्या खेळाडूच्या आनंदात आणि त्याचे अभिनंदन करायला तो नेहमी पुढे असतो. सुरेश रैनाने बर्याच वेळा हे दाखवून दिले आहे. तो बऱ्याचवेळा भारतीय संघासाठी आणि अनेक क्रिकेटपटूंसाठी ट्विटही करत असतो.
महत्त्वाच्या बातम्या-