---Advertisement---

‘त्यामुळे’ पाकिस्तानने भारताला मात दिली! गोलंदाजी प्रशिक्षकांनी कमी केले अर्शदीपच्या खांद्यावरील ओझे

On: मंगळवार, सप्टेंबर 6, 2022 3:13 PM
Shaun Tait
---Advertisement---

आशिया चषकात सुपर फोरमध्ये रविवारी 4 सप्टेंबर रोजी भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. अर्शदीप सिंग याने शेवटच्या षटकांमध्ये महत्वाच झेल सोडल्यामुळे त्याला या पराभवासाठी कारणीभूत ठरवले जात आहे. परंतु पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट याने भारताला पराभूत करण्यासाठी वेगवान गोलंदाज हॅरिस रउफ याला श्रेय दिले आहे. रउफने भारताच्या डावात शेवटचे षटक टाकले होते. 

पाकिस्तान क्रिकेटच्या ट्वीटर खात्यावरून शेअर केल्या गेलेल्या एका व्हिडिओत शॉन टेट (Shaun Tait) म्हणतो की, “माझ्यासाठी विजयाचा क्षण हॅरिस रउफ (Haris Rauf) याचे शेवटचे षटक होते. तो स्वतःच्या यॉर्कर आणि संथ गतीच्या चेंडूवर खूप मेहनत घेतो. भारताविरुद्ध शेवटच्या षटकात त्याने हीच गुणवत्ता योग्य प्रकारे वापरली.” दरम्यान, रउफने टाकलेल्या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू वाईट होता. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर विराट कोहलीने एकही धाव केला नाही. असे असले तरी, शेवटच्या दोन चेंडूंवर रवी बिश्नोईने दोन चौकार ठोकले आणि संघाला अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

निवृत्तीची फक्त औपचारिकता, ‘मि. आयपीएल’ रैनाची आयपीएल कारकीर्द तर तेव्हाच संपली होती!
काय घडलं जेव्हा ‘थाला-चिन्नाथाला’ उभे ठाकले एकमेकांसमोर, स्वतः रैनाने केला होता खुलासा 
चेन्नईच्या लाडक्या ‘चिन्नाथाला’च्या 5 करामती, ज्यामुळे जगाने मान्य केला ‘मिस्टर आयपीएल’  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---