---Advertisement---

नव्या टी२० विश्वविजेत्यांचं कौतुक! क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर शुभेच्छांचा पाऊस, पाहा ट्वीट्स

On: सोमवार, नोव्हेंबर 15, 2021 2:20 AM
---Advertisement---

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाने आठ गडी राखून सामना जिंकला. मिशेल मार्शने सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तर डेविड वॉर्नरने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजयाने ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर ट्विटरवर क्रिकेट चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, तर न्यूझीलंड संघाप्रती देखील प्रेम व्यक्त केले आहे. याशिवाय क्रिकेटवर्तुळातील विविध मान्यवर ट्विटरद्वारे व्यक्त झाले आहेत.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने म्हटले आहे की, ‘दबावात ऑस्ट्रेलिया संघ खूप अद्भुत खेळतो, न्यूझीलंड संघासाठी शुभेच्छा, मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी छान खेळ दाखवला.’ समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटले की, ‘ऑस्ट्रेलिया संघ खूप ताकदवान वाटला. मिशेल मार्शने अद्भुत खेळाडू आहे. त्याने जबरदस्त खेळी केली.’

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने म्हटले आहे की, ‘शुभ रात्री आणि खूप छान ऑस्ट्रेलिया.’ ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिसने म्हटले आहे की, ‘विश्वविजेता ऑस्ट्रेलिया.’

https://twitter.com/gilly381/status/1459936566697086976

भारतीय संघाचा गोलंदाज हरभजन सिंगने म्हटले आहे की, ‘टी२० विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन ऑस्ट्रेलिया. मिचेल मार्शने दमदार खेळ दाखवला.’ भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने ट्वीट करत म्हटले की, ‘विश्वविजेते झाल्याबद्दल ऑस्ट्रेलिया संघाचे खूप खूप अभिनंदन. वॉर्नर, मिशेल मार्श, हेझलवूड जबरदस्त खेळ दाखवलात.’

https://twitter.com/harbhajan_singh/status/1459937313773940738

https://twitter.com/virendersehwag/status/1459937328516894722

https://twitter.com/MichaelVaughan/status/1459931472706650116

https://twitter.com/shoaib100mph/status/1459937230114496516

https://twitter.com/ShaneWarne/status/1459936424388562944

https://twitter.com/ashwinravi99/status/1459937081308766208

https://twitter.com/GautamGambhir/status/1459936205387153409

https://twitter.com/sthalekar93/status/1459935201132351491

https://twitter.com/wasimakramlive/status/1459935608651108362

https://twitter.com/SDhawan25/status/1459937037176295424

https://twitter.com/rpsingh/status/1459936409431654401

https://twitter.com/MishiAmit/status/1459959374235910144

https://twitter.com/DineshKarthik/status/1459947115610730498

https://twitter.com/ShreyasIyer15/status/1459940269046984704

https://twitter.com/Mitch_Savage/status/1459971299317456897

https://twitter.com/MohammadNabi007/status/1459956079287226372

https://twitter.com/rashidkhan_19/status/1459942821637632005

https://twitter.com/azharflicks/status/1459945396206145540

https://twitter.com/KrisSrikkanth/status/1459940406473469966

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. केन विलियम्सनने ८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत २ गडी राखून लक्ष्य गाठले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार ऍरॉन फिंच अवघ्या ५ धावा करून माघारी परतला, त्याला ट्रेंट बोल्टने बाद केले. १५ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर मिशेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला.

मिशेल मार्शने ७७ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय डेविड वॉर्नरनेही ५३ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. मॅक्सवेलने २८ धावांची उपयुक्त नाबाद खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऑस्ट्रेलियाचा दबदबा! सर्वाधिकवेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रम कांगारुंच्या नावे, इतर संघ आसपासही नाहीत

आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिकवेळा उपविजेते होणाऱ्यांमध्ये न्यूझीलंड तिसरा, पहिल्या दोन क्रमांकावर ‘हे’ संघ

टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारा ऑस्ट्रेलिया ६ वा संघ; पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---