फेब्रुवारी २०२२ हा महिना भारतीय संगीतसृष्टीसाठी दु:खद ठरत असल्याचेच दिसून आले आहे. काहीदिवसांपूर्वीच गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झाले. त्या दु:खातून संगीतप्रेमी बाहेर येत असतानाच बुधवारी आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली, ती म्हणजे लोकप्रिय गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाबद्दल क्रिकेट विश्वातूनही दु:ख व्यक्त होत आहे.
बप्पी लहिरी यांचे मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. अखेर त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बप्पी लहिरी यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त करताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट केले आहे की, ‘मी बप्पी दा यांच्या संगीताचा खूप आनंद घेतला आहे, विशेषत: याद आ रहा है… हे गाणे ड्रेसिंग रूममध्ये अनेकदा ऐकले आहे. त्यांची प्रतिभा कमालीची होती. बप्पी दा तूम्ही आमच्या आठवणीत नेहमी राहाल.’ बप्पी लहिरी हे देखील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचे मोठे चाहते होते.
I really enjoyed Bappi Da's music, especially “yaad aa raha hai” – heard it several times in the dressing room. The range of his talent was truly amazing.
आप हमेशा हमें याद रहोगे बप्पी दा! pic.twitter.com/NFougJVt8c— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 16, 2022
सचिन व्यतिरिक्त भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने देखील ट्वीट करत बप्पी लहिरी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्वीट केले आहे की, ‘भारतीय संगीत क्षेत्राचा एक आयकॉन. बप्पी लहिरी तुमची कमी जाणवत राहिल. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.’
A icon of the Indian music industry. Bappi Lahiri you will be missed. May you RIP 🙏🏻
— Virat Kohli (@imVkohli) February 16, 2022
त्याचबरोबर अन्य आजी-माजी क्रिकेटपटूंनी देखील बप्पी लहिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Deeply saddened to hear about the death of #BappiLahiri
Great musicians leaving for their heavenly abode one after another.— Mohammed Azharuddin (@azharflicks) February 16, 2022
Heartfelt tribute to a legendary music composer & singer.
My deepest condolences to #BappiLahiri ji's family and friends for their loss. pic.twitter.com/nAYPWPQ6UL— DK (@DineshKarthik) February 16, 2022
A big loss for our music industry. A fantastic singer who gave us so many wonderful songs. May Bappi Ji RIP and God bless his soul 🙏🏻
— Kuldeep yadav (@imkuldeep18) February 16, 2022
माध्यमांतील वृत्तानुसार बप्पी लहिरी यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून उपचार सुरू होते. त्यांना सोमवारी डिस्चार्जही देण्यात आला होता. त्यांना ऑब्सट्रिक्टिव स्लीप एपनिया हा आजार होता. याच आजाराचा सामना करताना लहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लहिरी यांना अगदी लहान वयापासूनच संगीताची आवड लागली होती. त्यानंतर हळू हळू त्यांना यश मिळत गेले.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने ४ वर्षांनंतर घेतला पाकिस्तानी गोलंदाजाचा सूड, केले मिडल फिंगर सेलिब्रेशन
अवघ्या इतक्या धावा करताच विराट कोहली होऊ शकतो टी२० क्रिकेटचा ‘किंग’,मार्टिन गप्टीलला टाकणार मागे
काय सांगता!! केविन पीटरसनचे पॅन कार्ड हरवले, नरेंद्र मोदींकडे मागितली मदत