---Advertisement---

‘स्टेनगन’ची निवृत्ती! एबी डिविलियर्स ते जेम्स अँडरसन, क्रिकेटविश्वातून ‘अशा’ मिळाल्या डेल स्टेनला शुभेच्छा

On: बुधवार, सप्टेंबर 1, 2021 2:32 AM
---Advertisement---

गेल्या काही कालावधीत २०१० चे दशक गाजवलेल्या अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर केली. यात आता दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनचाही समावेश आहे. स्टेनने मंगळवारी (३१ ऑगस्ट) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना याबद्दल माहिती दिली. त्याच्या निवृत्तीनंतर त्याला पुढील आयुष्यासाठी अनेक आजी-माजी दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या.

स्टेनने निवृत्तीची घोषणा करताना लिहिले की ‘आज मी मला सर्वात जास्त आवडणाऱ्या खेळातून निवृत्ती घेत आहे. कडूगोड क्षण पण मी कृतज्ञ आहे. कुटुंबापासून ते संघसहकाऱ्यांपर्यंत, पत्रकारांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांना धन्यवाद. तुमच्याबरोबरच प्रवास मस्त होता.’

स्टेनने त्याच्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्टेनचा माजी संघसहकारी एबी डिविलियर्सने स्टेनला सर्वकालिन दिग्गज असे संबोधताना लिहिले की ‘दिग्गज खेळाडू, उत्तम व्यक्ती, शानदार आठवणी!’

https://twitter.com/ABdeVilliers17/status/1432646563898212352

तसेच जेम्स अँडरसनने ‘सर्वोत्तम’ अशा आशयाचे ट्विट करत प्रतिक्रिया दिली. याशिवाय विरेंद्र सेहवागने ‘तू आग होता, खेळात पाहिलेल्या दिग्गजांपैकी एक’

https://twitter.com/jimmy9/status/1432666048730443782

https://twitter.com/virendersehwag/status/1432653237069303814

तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील स्टेनचा संघसहकारी राहिलेल्या युजवेंद्र चहलने ट्विट केले की ‘तुझ्याबरोबर खेळणे आणि शिकणे शानदार होते. तुला निवृत्तीच्या शुभेच्छा.’

https://twitter.com/yuzi_chahal/status/1432673766543298563

भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना लिहिले की ‘तुझी कारकिर्द आणि यश शानदार आहे.’

https://twitter.com/anilkumble1074/status/1432673326015467526

याव्यतिरिक्तही अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी स्टेनला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/ShaneRWatson33/status/1432690597865787396

https://twitter.com/MichaelVaughan/status/1432651561931583490

https://twitter.com/henrygayle/status/1432699352758239232

https://twitter.com/DineshKarthik/status/1432678293371645954

https://twitter.com/DavidMillerSA12/status/1432759911151144962

https://twitter.com/mukundabhinav/status/1432708238617812994

https://twitter.com/MohammadKaif/status/1432736368568926209

https://twitter.com/JimmyNeesh/status/1432655465809334273

https://twitter.com/AnrichNortje02/status/1432665147395514368

https://twitter.com/englandcricket/status/1432647749913219077

https://twitter.com/mipaltan/status/1432667928655138821

https://twitter.com/patcummins30/status/1432656065158529025

https://twitter.com/HomeOfCricket/status/1432658443874222085

https://twitter.com/ImRaina/status/1432656006522318849

https://twitter.com/munafpa99881129/status/1432662458452230146

https://twitter.com/Colly622/status/1432820695856291840

https://twitter.com/ImSushVerma/status/1432679317163499520

https://twitter.com/dhawal_kulkarni/status/1432736701110161420

https://twitter.com/wasimakramlive/status/1432662866075652100

https://twitter.com/mmbangwa/status/1432681443474423818

https://twitter.com/IrfanPathan/status/1432693935860711427

https://twitter.com/KumarSanga2/status/1432708878513459200

https://twitter.com/shoaib100mph/status/1432707611867156499

https://twitter.com/ICC/status/1432656829574639623

https://twitter.com/WasimJaffer14/status/1432669122735661065

स्टेन हा क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या वेगाच्या जोरावर अनेक फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडले. त्याने त्याच्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेलाही अनेक सामने जिंकवून दिले. तो २०१० ते २०१५ यादरम्यान कसोटी क्रमवारील अव्वल क्रमांकावर राहिला होता. त्याने २०१९ मध्येच कसोटीतून निवृत्ती घेतली होती. मात्र, आता अखेर त्याने क्रिकेटपटू म्हणून कारकिर्द थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टेनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९३ कसोटी सामने, १२५ वनडे सामने आणि ४७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत २२.९५ च्या सरासरीने ४३९ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने २५.९५ च्या सरासरीने १९६ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने १८.३५ च्या सरासरीने ६४ विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय स्टेनने १४१ प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात ६१८ विकेट्स घेतल्या आहेत. तर १८० अ दर्जाच्या सामन्यांत त्याने २८४ विकेट्स घेतल्या. तो त्याच्या कारकिर्दीत २२८ टी-२० सामनेही खेळला. यात त्याने २६३ विकेट्स घेतल्या. त्याने आयपीएलमध्ये ९५ सामने खेळताना त्याने ९७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारीच! ४६ वर्षीय चेरलाथन पीकेएलच्या ७ संघांचा भाग होणारा पहिलाच कबड्डीपटू, ‘या’ संघांचे केलेय प्रतिनिधित्त्व

प्रो कबड्डी लिलावाची सांगता; सिद्धार्थ, गिरिश, रिशांकसह ‘या’ महाराष्ट्रीयन कबड्डीपटूंवर लागली बोली

भारतासाठी खुशखबर! फलंदाजांना जेरीस आणणारा इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज ओव्हल कसोटीतून होऊ शकतो बाहेर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---