---Advertisement---

किंग कोहलीवर आजी-माजी खेळाडूंकडून असा झाला शुभेच्छांचा वर्षाव!

On: बुधवार, नोव्हेंबर 6, 2019 1:56 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा काल(5 नोव्हेंबर) वाढदिवस होता. त्याने काल 31 व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने विराटवर आजी-माजी क्रिकेटपटूंकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

त्याला सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, सर विवियन रिचर्ड्स अशा दिग्गजांबरोबरच भारतीय संघातील मोहम्मद शमी, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर अशा युवा खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीनेही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने शुभेच्छांचे ट्विट करताना म्हटले आहे की ‘तूझे पुढील वर्ष शानदार असावे अशा शुभेच्छा दोस्त. तूला चांगले आरोग्य, शांतता मिळो आणि भरपूर यशाचे दुखापत मुक्त वर्ष जावो.’

https://twitter.com/chetrisunil11/status/1191653143093755906

त्याचबरोबर सचिन तेंडूलकरने विराटला शुभेच्छा देताना म्हटले आहे की ‘विराट तूला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू धावा करत रहा आणि भारताचे जिद्दीने नेतृत्व करत रहा. तूला शुभेच्छा.’

https://twitter.com/sachin_rt/status/1191603909007163392

विराटने ऑगस्ट 2008मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर त्याने आत्तापर्यंत 239 आंतराष्ट्रीय वनडे सामन्यात खेळताना 11520 धावा केल्या आहेत. तसेच 43 शतके ठोकली आहेत. कसोटीत विराटने 82 सामन्यांत 7066 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 26 शतके केली आहेत. त्याचबरोबर त्याने 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 22 अर्धशतकांसह 2450 धावा केल्या आहेत.

विराटला आजी-माजी खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा –

https://twitter.com/ivivianrichards/status/1191729385591726080

https://twitter.com/VVSLaxman281/status/1191554087420145664

https://twitter.com/virendersehwag/status/1191559857679273985

https://twitter.com/MohammadKaif/status/1191550490888331264

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1191651234677219328

https://twitter.com/MdShami11/status/1191742607224758279

https://twitter.com/klrahul11/status/1191738926035128320

https://twitter.com/Sundarwashi5/status/1191711779228831745

https://twitter.com/RishabhPant17/status/1191701908827725825

https://twitter.com/JadhavKedar/status/1191699291158405121

https://twitter.com/yuzi_chahal/status/1191655030857904129

https://twitter.com/SDhawan25/status/1191600182070300673

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---