---Advertisement---

बापरे! स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूचे नाव

---Advertisement---

अल जझीरा या वृत्तवाहिनीने एक स्टिंग ऑपरेशन केले होते. यामध्ये अल जझीरा वाहिनीने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप केले आहेत.

अल जझीरा या वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार ग्लेन मॅक्सवेल आणि ऑस्ट्रेलियाचे काही क्रिकेटपटू २०१७ साली रांची येथे भारत विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी झाले होते.

मात्र ग्लेन मॅक्सवेलने त्याच्यावर झालेले हे आरोप निराधार आहेत असे मत व्यक्त केले आहे.

“माझ्यावर झालेले हे आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. रांची कसोटी सामना माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सामना होता. या सामन्यात मी माझ्या कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक साजरे केले होते. या आरोपांमुळे  मी नारज आहे.  मला याप्रकरणामध्ये जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.” या शब्दात मॅक्सवेलने त्याच्यावर झालेल्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली.

अल जझीरा वृत्तवाहिनच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे जागतीक क्रिकेट वर्तुळात मोठे वादळ उठले होते.

आयसीसीनेही याप्रकरणी चौकशी समिती नेमून चौकशीचे आदेश दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

मला आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं – राहुल द्रविड

एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment