आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसी वेगवेगळे पुरस्कार जाहीर करत असते. यामध्ये महिन्यातील सर्वोत्तम आयसीसी खेळाडू पुरस्कार याचादेखील समावेश आहे. आयसीसीने सप्टेंबर 2022मध्ये केलेल्या उत्तम कामगिरीसाठी या पुरस्कारांसाठी दोन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी आयसीसी महिला आणि पुरुष पुरस्कार आपल्या नावावर केला आहे.
महिन्यातील सर्वोत्तम आयसीसी खेळाडूंच्या पुरस्कारामध्ये महिला गटात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आहे. तसेच, पुरुष गटात हा पुरस्कार पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याच्या नावावर झाला आहे.
A dashing captain has won the ICC Women’s Player of the Month for September 2022 🌟
More 👇
— ICC (@ICC) October 10, 2022
महिला क्रिकेटच्या पुरस्कारासाठी ज्या खेळाडूंना नामांकन मिळाले होते, त्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील क्वालिफायरमध्ये शानदार कामगिरी करणारी बांगलादेशची निगार सुलताना होती. तिच्यासोबतच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्म्रीती मंधाना यांचाही समावेश होता. मात्र, हरमनप्रीतने निगार आणि स्म्रीतीला पछाडत हा पुरस्कार आपल्या नावावर केला.
The ICC Women’s Player of the Month for September 2022 nominees 👀
Vote now ➡️ https://t.co/3lGTRFTK6o pic.twitter.com/UmfzsTDgeE
— ICC (@ICC) October 7, 2022
हरमनप्रीतसाठी सप्टेंबर महिना यादगार राहणारा होता. यामध्ये भारताने हरमनप्रीतच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 3-0ने आपल्या नावावर केली होती. भारताने 1999नंतर इंग्लंडमध्ये पहिला वनडे मालिका जिंकली होती. तिने तीन सामन्यांमध्ये 221 धावा चोपल्या. तिने पहिल्या वनडेत 74 धावांची खेळी केली, तर दुसऱ्या वनडेत 111 चेंडूत 143 धावा चोपल्या होत्या. तिसऱ्या वनडेत तिला फक्त 5 धावांवर तंबूत परतावे लागले होते.
Who gets your vote for the ICC Men’s Player of the Month for September 2022? 🗳️
Details ➡️ https://t.co/xsOBXP2iyI pic.twitter.com/58zdD8WjMM
— ICC (@ICC) October 7, 2022
पुरुषांच्या गटातील पुरस्कारासाठीच्या नामाकंनामध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन आणि भारतीय संघाचा अक्षर पटेल यांचाही समावेश होता. मात्र, मोहम्मद रिझवान याने पहिल्यांदाच बॅटमधून शानदार कामगिरी केली आणि हा पुरस्कार आपल्या नावावर केला. रिझवान याने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 7 सामन्यांच्या टी20 सामन्यात 300हून अधिक धावा चोपल्या होत्या. त्याने मागील महिन्यात आशिया चषकात खेळल्यामुळे 500 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हिला डाला ना! मैदान तर गाजवलंच, आता ‘माही भाईं’चा डोळा फिल्म इंडस्ट्रीवर; सुरू केलं प्रोडक्शन हाऊस
Asia Cup: स्नेह राणाच्या फिरकीसमोर थायलंडचे वाजले बारा! अवघ्या 37 धावांत टीम ऑलआऊट
T20 World Cup: वॉर्म-अप सामन्यावेळी विराट कोहलीने केले असे काही, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल