क्रिकेट खेळातील सर्वात मोठ्या ग्लोबल मार्केट रिसर्चचे आनावरण आयसीसीने केले. यात जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमा दिली आहे.
या ग्लोबल मार्केट रिसर्चमधून जगभरात क्रिकेटचे एक बिलियनपेक्षा जास्त चाहते असल्याचे समोर आले आहे.
या एक बिलियन चाहत्यांचे सरासरी वय ३४ आहे. यामध्ये ६१ टक्के पुरूष तर ३९ टक्के महिलांचा समावेश आहे.
तसेच या एक बिलियन चाहत्यांमधील ९५ टक्के चाहत्यांना एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकात अधिक रस आहे.
याचबरोबर या रिसर्चमधून समोर आले की महिला क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
यामध्ये ६८ टक्के चाहत्यांना महिला क्रिकेटमध्ये रस आहे. तर ६५ टक्के चाहते महिला विश्वचषकाविषयी उत्सुक असतात.
या एक बिलियन क्रिकेट चाहत्यांपैकी ७० टक्के चाहते महिली क्रिकेटचे लाइव्ह प्रसारण पाहू इच्छितात.
या रिसर्चमधून समोर आले की कसोटी क्रिकेट चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. टी-२० च्या जमान्यातही ७० टक्के चाहत्यांना कसोटी क्रिकेटमध्ये रस आहे.
अपेक्षेप्रमाणे इंग्लंडमधील ८६ टक्के क्रिकेट चाहत्यांना कसोटीमध्ये रस आहे. तर ९१ टक्के दक्षिण अफ्रीकन चाहते एकदिवसीय क्रिकेट पसंत करतात.
टी-२० क्रिकेटला सर्वात जास्त चाहते पाकिस्तानमधून लाभले आहेत. पाकिस्तानच्या ९८ टक्के क्रिकेट चाहत्यांना टी-२० क्रिकेट आवडते.
नील्सन स्पोर्ट्स द्वारा नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात केलेल्या या गोल्बल क्रिकेट मार्केट रिसर्चमध्ये क्रिकेट विषयी ही आकडेवारी समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेटमधील भागीदारीच नाव घ्याल तर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला तोड नाही
-१२ महिन्यात एकही वनडेत संधी न मिळालेला भारतीय गोलंदाज विश्वचषकासाठी आशावादी