टी 20 विश्वचषक 2024 चा 43 वा सामना आज (20 जून) भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही संघांचा सुपर-8 टप्प्यातील हा पहिलाच सामना असेल. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे या दोघांमधील हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे वाहून जाईल का? याआधीही बार्बाडोसमधील एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
स्थानिक हवामान खात्यानुसार, बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे ढगाळ वातावरण असू शकते. मात्र, सामन्यादरम्यान म्हणजेच सकाळी 10 च्या सुमारास पावसाची शक्यता 10 ते 20 टक्केच आहे. मात्र, ही परिस्थिती 1 वाजेपर्यंत 50 टक्के असेल. चाहत्यांना पूर्ण सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहता येईल, अशी आशा आहे. सामन्यादरम्यान तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. आता सामन्यात पावसाचा हस्तक्षेप होणार नाही अशी आशा बाळगुयात.
वास्तविक, बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात झालेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. सामन्यात दोनदा पाऊस पडला. दुसऱ्यांदा असा पाऊस पडला की सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे सामना रद्द करावा लागला होता.
भारत आणि अफगाणिस्तानने साखळी फेरीत अप्रतिम कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. मात्र, कॅनडाविरुद्धचा त्यांचा चौथा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरे म्हणजे, अफगाणिस्तानने पहिल्या तीन सामन्यांमध्ये युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा पराभव केला आणि शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 104 धावांनी पराभव पत्करावा लागला.
महत्तवाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये आधिराज्य गाजवणाऱ्या किंग कोहलीनं आजच्या दिवशी केलं होतं पदार्पण!
गतविजेत्या इंग्लंडनं यजमान वेस्ट इंडिजला चारली धूळ; 8 विकेट्सनी मिळवला एकतर्फी विजय
सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 18 धावांनी शानदार विजय!