एजबेस्टन मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड भारताचा पराभव करण्यात यशस्वी ठरला असला तरी त्यांना विराटला कोहलीला रोखण्यात अपयश आले आहे.
इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी विराट कोहलीला गांभीर्याने घेत त्याला रोखण्यासाठी इंग्लिश गोलंदाजांना खास सल्ला दिला आहे.
“मी आमच्या गोलंदाजांना सांगितले आहे, तुम्ही विराट सोडून बाकीच्या भारतीय फलंदाजांना जितक्या लवकर बाद कराल तितक्या लवकर विराटला दबावात टाकण्याची संधी आपल्याला मिळेल.” असे बेलिस म्हणाले.
तसेच बेलिस यांनी विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करत विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही असे वक्तव्य देखील केले.
“मला असे वाटते नाही की विराट जागातील सर्वोत्तम फलंदाज आहे. मात्र तो त्याच्या जवळपास आहे. विराटने पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात जी फलंदाजी केली ती अतिशय उच्च दर्जाची होती.”
“सध्याचा भारतीय संघ उत्कृष्ठ आहे. मात्र जेव्हा चेंडू स्विंग होतो तेव्हा त्यांचे फलंदाज स्वस्तात बाद होतात. याला विराटही अपवाद नाही. ” असे ट्रेवर बेलिस म्हणाले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-आजपासून मध्यप्रदेश कबड्डी लीगचा थरार, या चॅनेलवर थेट प्रेक्षपण
-विश्वचषकात अपयश येऊ नये म्हणुन स्टेनकडे आहेत या योजना