बर्मिंघहम | भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध बुधवारपासून (१ ऑगस्ट) सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भुवनेश्ववर कुमार आणि जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवणार नाही.
असे मत इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गुच यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
“भुवनेश्वर कुमार संघात नसल्याने भारतीय गोलंदाजीची ताकद कमी झाली असली तरी त्याचा भारतीय संघाला फारसा फरक पडणार नाही. कारण आज भारताकडे वेगवान गोलंदाजांची चांगली फळी आहे. मात्र यापूर्वी त्यांना जवागल श्रीनाथ, जहीर खान आणि अनिल कुंबळे सारख्या फिरकी गोलंदाजांच्या भरोशावर रहावे लागायचे.” असे गुच म्हणाले.
पुढे त्यांनी भारतीय संघ अलिकडील काळात भक्कम झाल्याचेही मत व्यक्त केले.
“आज जर तुम्हाला भारताला पराभूत करायचे असेल तर संपूर्ण सामन्यात त्यांच्यावर वर्चस्व राखणे आवश्यक आहे. मग तुम्ही भारताविरुद्ध त्यांच्या देशात खेळत असाल किंवा तुमच्या देशात खेळत असला तरी भारतीय संघ तितकाच भक्कम असतो.” असे डॅरेन गुच म्हणाले.
डॅरेन गुच यांनी इंग्लंडकडून ५८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी २२९ बळी मिळवले आहेत. तर १५९ कसोटी सामन्यात २३५ बळी मिळवले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-तडाखेबंद खेळी करत स्म्रीती मानधनाने केली विश्वविक्रमाची बरोबरी
-गांगुलीला मागे टाकत कॅप्टन कोहली होणार नवा ‘दादा’?