गेल्या तीन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या कृणाल पंड्याचा दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
कृणाल पंड्याच्या या निवडीवर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंड्या बंधूंचे प्रशिक्षक किरण मोरे यांनी आनंद व्यक्त केला. तसेच मोरे यांनी पंड्या बंधूचा इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत अंतिम अकरा खेळाडूंमध्ये समावेश केल्यास भारतीय संघास मोठा लाभ होईल असे मत मांडले आहे.
“कृणाल एक उत्कृष्ठ गेमचेंजर आणि फिनीशर आहे. त्याचा भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये समावेश केल्यास भारतीय संघाला फलंदाजीसह सहावा गोलंदाज म्हणुनही उपयोग करता येईल”, असे भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे म्हणाले.
कृणाल आणि हार्दिक पंड्याचे लहानपणीचे प्रशिक्षक किरण मोरेंनी यावेळी त्यांनी २० वर्षापूर्वी कृणाल विषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.
“मी २० वर्षापूर्वीच भाकित वर्तवले होते की पुढे जाऊन कृणाल भारताचे प्रतिनिधित्व करेल. त्याची कामगिरी फक्त आयपीएलमध्येच नव्हे तर देशांतर्गत आणि भारतीय अ संघाकडून खेळतानाही चांगली झाली आहे.” असे किरण मोरे कृणालबद्दल बोलताना म्हणाले.
भारतीय क्रिकेट संघाच्या महत्त्वपूर्ण इंग्लड दौऱ्याची मंगळवार, ३ जुलैपासून सुरवात होत आहे.
भारतीय संघाला इंग्लंड विरुद्धची टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला होता.
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापतीमुळे या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.
जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांच्या जागी दीपक चहर आणि कृणाल पंड्याची निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-होय, किंग कोहलीला साहेब घाबरले आहेत…
-भारतीय अ संघाने इंग्लंडला इंग्लंडमध्ये लोळवले; जिंकली तिरंगी मालिका