---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा चेन्नईत होणार श्रीगणेशा! ‘या’ तारखेला भारतीय संघ प्रवेश करणार बायो बबलमध्ये

---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला अखेरचा सामना खेळतो आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ मायादेह्सात परतेल. भारतीय संघ आपली पुढील मालिका फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. ही मालिका भारतातच आयोजित करण्यात आली आहे. या दरम्यान या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

मात्र सध्या कोरोना विषाणूच्या नव्या नियमांमुळे खेळाडूंना संपूर्ण मालिकेदरम्यान जैव सुरक्षित वातावरणात अर्थात बायो बबलमध्ये रहाणे बंधनकारक असते.  आत्ताही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ संपूर्ण काळ बायो बबलमध्ये व्यतीत करत आहे. या दौऱ्यावरून परत आल्यावर खेळाडूंना काही काळ घरी जाण्याची  परवानगी असेल. मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी २७ जानेवारीला भारतीय संघातील सगळे खेळाडू पुन्हा एकदा बायो बबलमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेला कसोटी सामन्यांनी सुरुवात होईल. यातील पहिले दोन सामने चेन्नई येथे अनुक्रमे ५ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारीपासून सुरु होतील. यातील पुढील दोन सामने अनुक्रमे ४ मार्च आणि १२ मार्चपासून अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील. यांनतर ५ सामन्यांची टी-२० मालिकादेखील अहमदाबाद येथेच खेळवली जाईल.

या मालिकेसाठी भारतीय संघ चेन्नईत २७ जानेवारीला बायो बबलमध्ये प्रवेश करेल. मात्र यापूर्वी संपूर्ण संघाची कोरोना चाचणी करण्यात येईल. ही चाचणी नकारात्मक आलेल्या खेळाडूंनाच मालिकेत सहभागी होता येईल.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test : पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला; तिसऱ्या दिवशी लवकर सुरु होणार सामना, भारत अद्याप ३०७ धावांनी पिछाडीवर

अरेरे..! तब्बल दहा महिने श्रीलंकेत इंग्लंडच्या खेळण्याची वाट बघणाऱ्या प्रेक्षकाला हकलवले स्टेडियमबाहेर, जाणून घ्या कारण

PAK vs SA : कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा २० जणांचा संघ जाहीर; तब्बल ८ खेळाडूंना डच्चू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---