बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गुरुवारी (2 आॅगस्ट) भारताचा पहिला डाव 76 षटकात 274 धावांवर संपूष्टात आला आहे. भारताकडून विराट कोहलीने 149 धावा करत शतक केले.
इंग्लंडने पहिल्या डावात भारतावर किरकोळ 13 धावांची आघाडी मिळवत आपल्या दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 9 धावा केल्या आहेत.
या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात विराट कोहलीचा झेल घेण्याच्या प्रयत्नात इंग्लंडच्या जॉश बटलरच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली आहे.
हाती अालेल्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जॉश बटलरच्या बोटाचा एक्सरे काढण्यात आला आहे. त्यामध्ये त्याचे बोट फ्रॅक्चर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र तो उर्वरित सामन्यात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणार की नाही याची माहिती देने इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने टाळले आहे.
त्यामुळे जर बटलरची ही दुखापत गंभीर असल्यास त्याचा इंग्लंड संघाला मोठा धक्का बसणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आणि चमकदार कामगिरी केली आहे.
बटलरच्या या कामगिरीमुळेच भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी त्याला इंग्लंडचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-पहिली कसोटी: विराट कोहलीचा शतकी तडका; तर इंग्लंडची दुसऱ्या डावाला खराब सुरुवात
-पहिली कसोटी: विराट कोहलीने टीम इंडियाला तारले