टीम इंडियाने काल रात्री (शनिवार, 29 जून) भारतीय चाहत्यांची टी20 विश्वचषकाची इच्छा पूर्ण केली. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2024 च्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी राहुल द्रविडला खांद्यावर उचलले नाही तर हवेत फेकले.
राहुल द्रविडला हवेत फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की प्रथम रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांशी बोलतात आणि एक योजना बनवतात आणि नंतर राहुल द्रविडला खांद्यावर उचलतात आणि बाकीचे खेळाडू त्याला आधार देतात आणि त्याला 3-4 वेळा हवेत उंचवतात. हा क्षण खरोखरच पाहण्यासारखा होता. मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडचा हा शेवटचा सामना होता. टी20 विश्वचषक संपल्यानंतर त्याचा कार्यकाळही संपला. तसेच 2011 चा विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीसह अनेक भारतीय खेळाडूंनी सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर उचलून धरले होते.
They are making it extra special for Dravid. Kohli behind the planning. 🤣 pic.twitter.com/dhe4wUoPYV
— ∆ 🏏 (@CaughtAtGully) June 29, 2024
टी20 विश्वचषकाचा खिताब जिंकताच रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती झाहीर केली. या टी विश्वचषकामधील अंतिम सामना दोघांच्या कारकीर्दमधील शेवटचा टी20 सामना ठरला. प्रथम, सामन्याच्या सादरीकरणाबद्दल बोलताना कोहली म्हणाला की हा त्याचा शेवटचा टी -20 विश्वचषक आणि टीम इंडियाचा शेवटचा टी -20 सामना होता. त्यानंतर सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
महत्तवाच्या बातम्या-
3 खेळाडू जे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे कर्णधार बनू शकतात
टीम इंडियाच्या विजयानंतर ढसाढसा रडला इरफान पठाण; म्हणाला, “मागील दहा दिवस…”
भारतीय संघ टी20 विश्वविजेता! पीएम मोदींकडून मिळाल्या खास शुभेच्छा