---Advertisement---

बीसीसीआयपुढील अडचणीत वाढ? आयपीएलच्या मेगा लिलावास उशीर होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

On: रविवार, डिसेंबर 19, 2021 9:54 PM
IPL-Trophy
---Advertisement---

आयपीएलच्या आगामी २०२२ (IPL 2022) हंगामापूर्वी मेगा लिलाव (IPL mega auction) आयोजित केला जाणार आहे. आयपीएल फ्रेंचायझींनी या मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर संघातील अनेक दिग्गजांना रिलीज केले आहे. पुढच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या लिलावाचे आयोजन केले जाईल असे सांगितले जात होते. पण आता हा लिलाव जानेवारी महिन्यात तिसऱ्या किंवा चौथ्या आडवड्यापूर्वी होईल, अशी माहिती मिळाली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयने (bcci) यापूर्वी आयपीएल फ्रेंचायजींना अनौपचारीक पद्धतीने मेगा लिलाव जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती दिली होती. आयपीएलमध्ये पुढच्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार आहेत. यापैकी अहमदाबाद फ्रेंचायझीसंबंधीत काही अंतिम निर्णय घेण्यासाठी उशीर झाला आहे आणि याच कारणास्तव लिलाव देखील उशीरा होणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही अजूनही अहमदाबाद फ्रँचायझीच्या सीव्हीसी ओनरशीपसाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीच्या निर्णयाची प्रतिक्षा करतो आहोत. जोपर्यंत हा निर्णय होत नाही, तोपर्यंत लिलावाची तारीख ठरवली जाऊ शकत नाही. त्यापूर्वी आम्हाला लखनऊ आणि अहमदाबाद दोन्ही संघांना लिलावापूर्वी त्यांचे तीन खेळाडू निवडण्यासाठी योग्य विंडो (अपेक्षित वेळ) देखील द्यावा लागेल. आम्हाला नाही वाटत की, जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यापूर्वी लिलाव होईल.

बीसीसीआयने सांगितल्याप्रमाणे पुढच्या हंगामापूर्वी सर्व फ्रेंचायझींना संघातील चार खेळाडूंना सोडून इतर सर्व खेळाडूंना रिलीज केले आहे. जे चार खेळाडू त्यांनी पुढच्या हंगामासाठी संघात कायम ठेवले आहेत, त्यांची यादी मागच्या महिन्यात बीसीसीआयला मिळाली आहे. आयपीएलमध्ये नव्याने सामील होणाऱ्या लखनऊ फ्रेंचायझीने आधीच घोषणा केली आहे की, त्यांच्या संघाचे प्रशिक्षक एंडी फ्लावर असतील आणि गौतम गंभीर संघाचा मेंटॉर असेल.

पुढच्या हंगामापूर्वी सध्याच्या आठ फ्रेंचायझींनी २७ खेळाडूंनी रिटेन केले आहे, तर अनेक दिग्गज खेळाडूंना रिलीज देखील केले आहे. अशात मेगा लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लागताना दिलेस यात शंका नाही.

महत्वाच्या बातम्या –

अंडर १९ विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, कौशल तांबेसह महाराष्ट्राच्या ‘या’ ३ शिलेदाराचाही संघात समावेश

फलंदाजी, गोलंदाजीत फेल, पण क्षेत्ररक्षणात स्टोक्सने दाखवला दम; चेंडू मैदानावर पडण्याआधी टिपला ‘अद्भुत झेल’

‘ऍशेस’वर कोरोनाचे सावट, स्टार क्रिकेटरची मुलाखत घेणारा पत्रकार आढळला पॉझिटिव्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---