बुधवार दि.२७ जून रोजी झालेल्या इंग्लंड वि.ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव टी-२० सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर २८ धावांनी विजय मिळवला.
एकदिवसीय मालिका ५-० अशा फरकाने गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी इंग्लंडमध्ये प्रतिष्ठा वाचवण्याची शेवटची संधी होती.
मात्र जॉस बटलर आणि जेसन रॉय यांच्या वादळात ऑस्ट्रेलियचा पुन्हा एकदा धुव्वा उडाला.
ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फिंचचा हा निर्णय चुकीचा ठरवत इंग्लंडची सलामी जोडी जेसन रॉय आणि फार्ममध्ये असलेल्या जॉस बटलरने ८.५ षटकात ९५ धावांची सलामी दिली.
इंग्लंडचा सलामीवीर बटलरने २२ चेंडूत अर्धशतक करत इंग्लंडकडू टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा मान मिळवला. बटलरने ३० चेंडूत ६१ धावा केल्या तर जेसन रॉयने २६ चेंडूत ४४ धावा केल्या.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलेल्या २२२ धावांचा पठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ १९.४ षटकात सर्वबाद १९३ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ८४धावा करणाऱ्या कर्णधार फिंचची एकाकी खेळी इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरली.
फिंच व्यतिरीक्त २९ धावा करणारा अॅस्टन अगर वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तब्बल पाच फलंदाजांना दोन आकडी धाववसंख्याही गाठता आली नाही.
येत्या ३ जुलैपासून भारताविरुद्ध इंग्लंडची टी-२० मालिका सुरू होणार आहे.
सध्या तुफान फार्ममध्ये असलेल्या इंग्लंड संघाचे भारतासमोर कडवे आव्हान असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेटमधील भागीदारीच नाव घ्याल तर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला तोड नाही
-जगातील एकूण क्रिकेट चाहत्यांची संख्या तुम्हाला माहित आहे का?