---Advertisement---

नाद नाद नादच! यो-यो टेस्टमध्ये पास झाला ‘किंग’ कोहली; स्कोर पाहून तुम्हीही म्हणाल, ‘तू भारीच’

On: गुरूवार, ऑगस्ट 24, 2023 1:46 PM
Virat-Kohli-Yo-Yo-Test
---Advertisement---

सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या एका मोठ्या स्पर्धेकडे आहे. ते म्हणजे आशिया चषक 2023 होय. या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करताना दिसत आहे. या यादीत भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सर्वात पुढे आहे. भारतीय संघासाठी आशिया चषकापूर्वी 6 दिवसांच्या कँपचे आयोजन आहे, जिथे खेळाडूंच्या फिटनेसला खास महत्त्व दिले जात आहे. अशातच विराट कोहली योयो टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर खूपच खुश झाला. याबाबत त्याने आपल्या सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

विराट कोहली यो-यो टेस्ट
विराट कोहली (Virat Kohli) याने यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) उत्तीर्ण झाल्यानंतर आपला आनंद सोशल मीडियावरून व्यक्त केला. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तो शर्टलेस होऊन मैदानावर बसल्याचे दिसत आहे. या फोटोमार्फत त्याने यो-यो टेस्ट संपल्यानंतर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्याने लिहिले की, “खतरनाक कोन्समध्ये यो-यो टेस्ट संपवण्याचा आनंद.” यासोबतच त्याने त्याचे गुण 17.2 लिहीत डन असे म्हटले. आता त्याची ही स्टोरी सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. खरं तर, यो-यो टेस्ट पास करण्यासाठी 16.5 गुणांची आवश्यकता असते.

Virat-Kohli-Insta-Story
Photo Courtesy: Instagram/virat.kohli

वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते शतक
अलीकडेच वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा विराट कोहली भाग होता. इथेच विराटने भारताकडून अखेरचा सामना खेळला. त्याने कसोटी मालिकेतील खेळलेला अखेरचा सामना त्याच्या कारकीर्दीतील 500वा आंतरराष्ट्रीय सामना होता. यामध्ये त्याने शतक ठोकले होते. मात्र, त्यानंतर विराट वनडे मालिकेतील एका सामन्याचा भाग होता, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. आता तो आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतून मैदानावर पुनरागमन करेल.

पाकिस्तानविरुद्ध उतरणार मैदानात
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशिया चषकातील पहिला सामना भारतीय संघ 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील हा बहुप्रतिक्षित सामना श्रीलंकेत खेळला जाईल. आशिया चषकाविषयी बोलायचं झालं, तर स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. यामधील 4 सामने पाकिस्तानमध्ये, तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळले जातील. भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. यावेळी आशिया चषक स्पर्धा टी20 नाही, तर वनडे क्रिकेट प्रकारात खेळली जाणार आहे. (cricket king virat kohli complete yoyo test with score of 17 2 before asia cup 2023)

हेही वाचा-
‘भारतात त्याच्यापेक्षा चांगला बॉलर नाही…’, Asia Cupच्या संघातून चहलला बाहेर काढल्याने संतापला दिग्गज
हॅरी ब्रूकची अविश्वसनीय फिल्डिंग, Catch पकडण्यासाठी दोनदा गेला बाऊंड्रीच्या पलीकडे; तुम्हीही कराल कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---