इंग्लंडमध्ये नुकतीच भारत अ, इंग्लंड लायन्स आणि वेस्ट इंडिज अ यांच्या एकदिवसीय तिरंगी मालिका पार पडली.
या मालिकेत भारताने इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद मिळवले.
या तिरंगी मालिकेत भारतीय संघात अष्टपैलू कृणाल पंड्याचा समावेश करण्यात आला होता.
या मालिकेतील इंग्लंड लायन्स विरुद्धच्या एका सामन्यात फिरकी गोलंदाज असलेल्या कृणालने बाऊन्सर टाकून इंग्लंड लायन्सच्या फलंदाजाला आश्चर्यचकित केले होते.
याचा व्हीडीओ खुद्द कृणाल पंड्याने ट्विटरवर शेअर करुन फिरकी गोलंदाजांची बाजू घेत मजेशीर ट्विट केले.
Why should fast bowlers have all the fun? 😂😜 pic.twitter.com/vpuqFH90PC
— Krunal Pandya (@krunalpandya24) July 18, 2018
“व्हाय शूड फास्ट बॉलर्स हॅव ऑल द फन?” असे आपल्या ट्विटमध्ये म्हणत कृणालने त्याने टाकलेल्या बाऊन्सरचे समर्थन केले.
कृणालच्या या ट्विटनंतर स्टार फिरकीपटू रशिद खानने रिट्विट करत कृणालला पाठिंबा दर्शवला.
Exactly we should work on it 💪💪💪
— Rashid Khan (@rashidkhan_19) July 18, 2018
“आपण याचा नक्कीच वापर करायला हवा.” असे रशिद खान म्हणाला.
क्रिकेटमध्ये बाऊन्सर चेंडू वेगवान गोलंदाजांचे मुख्य शस्त्र आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांनी बाऊन्सर टाकला तर त्यात काही नवे नसते.
मात्र फिरकीपटू असलेल्या कृणालने बाउंसर टाकल्याने याची क्रिकेट विश्वात चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा यू टर्न, विराट विषयी मी असे म्हणालोच नव्हतो
–गौतम गंभीर नंतर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचे धोनीविषयी मोठे वक्तव्य