---Advertisement---

अंदाज दिग्गजांचे: कोण जिंकणार भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका?

---Advertisement---

भारताची आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका सुरु होण्याआधी अनेक आजी-माजी खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. त्यातील अनेक दिग्गजांनी तर ही कसोटी मालिका कोण जिंकणार याचेही अंदाज बांधले आहे.

यामध्ये सुनील गावसकर, व्हिव्हिएस लक्ष्मण, आरपी सिंग, अनिल कुंबळे, रिकी पॉटिंग, ग्लेन मॅकग्रा यांनी ही मालिका कोणता संघ किती फरकाने जिंकेल याचे अंदाज वर्तवले आहेत.

तसेच शेन वॉटसन, डेल स्टेन, फाफ डु प्लेसी, शाहीद आफ्रिदी यांनी कोण किती सामने जिंकतील याचे अंदाज जरी वर्तवले नसले तरी त्यांनी विजेता संघ कोण असेल याचे अंदाज बांधले आहेत.

या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे होणार असून या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यानंतर पुढील दुसरा, तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे पर्थ, मेलबर्न आणि सिडनीमध्ये होईल.

या मालिकेबद्दल अंदाज दिग्गजांचे (भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका 2018-19):

फारुक इंजिनीयर – भारत 4 आॅस्टेलिया 0

सुनिल गावसकर – भारत 3 आॅस्टेलिया 0

व्हीव्हीएस लक्ष्मण –  भारत 3 आॅस्टेलिया 1

आरपी सिंग – भारत 3 आॅस्टेलिया 1

अनिल कुंबळे – भारत 2 आॅस्टेलिया 1

रिकी पाॅटिंग – भारत 1 आॅस्टेलिया 2

ग्लेन मॅकग्रा – भारत 0 आॅस्टेलिया 4

डेल स्टेन – विजेता संघ- आॅस्ट्रेलिया

फाफ डु प्लेसीस – विजेता संघ- आॅस्ट्रेलिया

शाहीद आफ्रिदी – विजेता संघ- भारत

महत्त्वाच्या बातम्या:

२०१८ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली अव्वल तर धोनी दुसऱ्या क्रमांकावर

आॅस्ट्रेलियाच्या या वेगवान त्रिकूटापेक्षाही इशांत शर्माने अॅडलेडवर खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने

२०११ च्या विश्वचषकातील फक्त हे दोन खेळाडू सध्या टीम इंडियाकडून खेळत आहेत वनडे क्रिकेट

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँडी मरे, सेरेना विल्यम्स करणार पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment