क्रिकेट जगतात असे अनेक खेळाडू आहेत, जे त्यांच्या त्यांच्या संघाला अगदी तळापासून एका अभिमानास्पद पातळीपर्यंत घेऊन येतात. आपल्या संघाला लढायला शिकवतात. परंतु काही वेळा त्यांना खराब कामगिरीमुळे नकोशा प्रश्नांचा सामना करावा लागतो किंवा टीकेला सामोरे जावे लागते.
अशाच प्रकारे बांगलादेश संघाचा कर्णधार मश्रफे मोर्तझाला (Mashrafe Mortaza) पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यानंतर मोर्तझाने पत्रकारांना (Journalist) सुनावले.
बांगलादेश (Bangladesh) संघाला मोर्तझाने चांगल्या स्तरापर्यंत पोहोचविले आहे. तसेच कर्णधार म्हणून आपल्या संघाला चांगल्या पातळीपर्यंत पोहोचविले. त्यामुळे बांगलादेश संघाला इतका सन्मान दिला जातो.
परंतु काही दिवसांपासून मोर्तझा खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे तो पत्रकारांच्या निशान्यावर आहे. शनिवारी (29 फेब्रुवारी) एका पत्रकाराने मोर्तझाला प्रश्न विचारला की, त्याला विश्वचषकातील आपल्या फॉर्ममुळे लाज वाटत आहे का? या प्रश्नामुळे तो भडकला आणि त्याने पत्रकाराला खडे बोल सुनावले.
यावेळी पत्रकाराला प्रत्युत्तर देताना मोर्तझा म्हणाला की, “मला का लाज वाटेल? मी चोर आहे का? मी मैदान चोरले आहे का? मी चोर आहे का? क्रिकेट खेळताना मला लाज किंवा सन्मान यांसारख्या गोष्टी जोडण्याचे समजत नाही.”
“असे लोक आहेत. जे चोर आणि गद्दार दोन्ही आहेत? ते या गोष्टीवर त्यांना लाज वाटत नाही का? जर मला एका सामन्यात विकेट नाही मिळाली. त्यामुळे मला लाज वाटली पाहिजे? मी चोर आहे का?,” असेही मोर्तझा यावेळी म्हणाला.
“मला विकेट नाही मिळाली तर यानंतर तुम्ही आणि माझे चाहतेही माझ्यावर टीका करू शकता. परंतु मला लाज का वाटली पाहिजे? मी बांगलादेशसाठी खेळत नाही का? मी इतर कोणत्या देशासाठी खेळत आहे का, ज्यासाठी चांगली कामगिरी नाही केल्यामुळे लाज वाटली पाहिजे? जर मी चांगली कामगिरी करत नसेल तर ते मला संघातून काढू शकतात. हे सोपे आहे,” असेही मोर्तझा आपल्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला.
झिंबाब्वेविरुद्ध (Zimbabwe) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी मोर्तझा असे म्हणाला. मोर्तझाच्या कारकिर्दीतील ही शेवटची मालिका असू शकते. यानंतर तो कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मोर्तझाने आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये बांगलादेशकडून खेळताना 8 सामन्यात फक्त 1 विकेट घेतली होती. त्याचा इकोनॉमी रेट हा 6.44 होता.
हा दिग्गज म्हणतो, टीम इंडियाला महान होण्यासाठी करावी लागले ही गोष्ट
वाचा????https://t.co/7Szrc4lu9P????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020
केन विलियम्सनला बाद केल्यानंतर विराट कोहलीने केले 'असे' सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ
वाचा????https://t.co/fdpK4xKs95????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020






