क्रिकेटविश्वात पंच नेहमीच विचित्र निर्णयामुळे चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र, आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका पंचाला सामन्यात नो-बॉल देणं महागात पडलं आहे. ही घटना ओडिसाच्या कटक येथील आहे. एका सामन्यात नो-बॉल दिल्यामुळे पंच बनलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, मृत झालेल्या व्यक्तीचे वय 22 वर्षे होते. तसेच, त्याचे नाव लकी राऊत (Lucky Raut) असल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की, सामन्यात नो-बॉल (No-Ball) दिल्यामुळे त्या तरुणाची स्मृती रंजन (Smriti Ranjan) नावाच्या तरुणाशी भांडण झाले होते. त्यामुळे त्याने राऊतला चाकू खुपसून मारले. (cricket match umpire killed by stabbing in field over a no ball decision)
क्रिकेट सामना सुरू असताना ही घटना जेव्हा घडली, तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रंजनने राऊतला मैदानातच चाकू खुपसून मारले. चाकू मारताच मैदानात उपस्थित तरुणांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी अवस्थेत असलेल्या राऊतला त्याच्या संघसहकाऱ्यांनी जवळच्या सीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
माध्यमांतील वृत्तांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, हा एक स्पर्धेतील सामना होता. हा क्रिकेट सामना ब्रह्मपूर आणि शंकरपूर संघात खेळण्यात आला होता. लकी राऊत याच्या मृत्यूमुळे दोन्ही गावात तणावाचे वातावरण आहे. प्रशासनाने सावधगिरी म्हणून गावात पोलिसांचा फौजफाटा तैणात केला आहे. जेणेकरून कोणतीही वाईट घटना घडणार नाही. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023बाबत ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ 4 संघ करतील प्लेऑफमध्ये एन्ट्री, RCBची हाकालपट्टी
अशी ताकद लावायची! दिग्गज विराटकडून युवा फलंदाज तिलक अन् नेहालला खास टिप्स, फोटो जोरदार व्हायरल