लखनऊ सुपर जायंट्स सध्या आयपीएल 2024 मध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. त्यांनी 4 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 1 सामन्यात पराभव पत्कारला आहे. संघ 6 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. लखनऊचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत (12 एप्रिल) होणार आहे. मात्र या सामन्याच्या आधीच लखनऊला मोठा झटका बसला.
लखनऊला दिल्लीविरुद्धचा सामना आपल्या प्रमुख गोलंदाजांशिवाय खेळावा लागणार आहे. आजच्या सामन्यात लखनऊचे वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि मोहसिन खान खेळणार नाहीत. संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
मयंक यादव हा कमीत कमी दोन सामने खेळू शकणार नाही. त्याला गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. त्या सामन्यात त्यानं एकच ओव्हर टाकला होता. अपेक्षा होती की, तो त्या सामन्यात परतेल पण दुखापत गंभीर असल्यामुळे तो पुढे खेळू शकला नाही. आता मयंकविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. दुखापत गंभीर असल्यामुळे तो पुढील दोन्ही सामने खेळू शकणार नाही, अशी माहिती जस्टिन लँगर यांनी दिली आहे.
मयंक यादव कधी परतणार?
मयंक यादवविषयी लखनऊचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितलं की, ” एमआरआई स्कॅनमध्ये समोर आलं आहे की त्याला पोटाच्या खालच्या भागाला नाजूक सूज आहे. त्यामुळे तो दिल्ली विरुद्ध आणि केकेआर विरुद्ध खेळणार नाही. आम्ही प्रयत्न करणार आहे की तो चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल. आम्ही आशा करतो की, मयंकनं संघासाठी प्रत्येक सामना खेळावा.”
मोहसिन खानबद्दल जस्टिन लँगर काय म्हणाले?
मोहसिन खानबद्दल बोलताना जस्टिन लँगर म्हणाले की, “त्यानं गोलंदाजी सुरु केली आहे. शक्यता आहे की, तो दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. परंतु आमचं ध्येय आहे की त्यानं केकेआर विरुद्धच्या सामन्यात खेळावं. कारण ईडन गार्डनच्या मैदानावर वेगवान गोलंदाज अधिक महत्त्वाचा राहू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या
एकाच डावात तिघांची अर्धशतकं अन् तिघे शून्यावर बाद! आरसीबी पराभवातही रेकॉर्ड बनवते
आरसीबीविरुद्ध 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज, जसप्रीत बुमराहनं मोडला 9 वर्ष जुना विक्रम
“नाहीतर मी कॅनडाकडून खेळण्याचा प्रयत्न केला असता”, जसप्रीत बुमराहचा धक्कादायक खुलासा