---Advertisement---

आधी नतमस्तक झाला, मग मिठी मारली; मोहम्मद सिराजनं जसप्रीत बुमराहचा असा केला सन्मान, पाहा VIDEO

---Advertisement---

आयपीएल 2024 चा 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चौकार, षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. मुंबईनं हा सामना 7 गडी राखून जिंकला आणि या हंगामातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर आरसीबीचे फलंदाज हतबल दिसत होते. बुमराहनं या सामन्यात 21 धावा देऊन 5 बळी घेतले. मात्र दुसरीकडे आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एकही विकेट घेता आली नाही. सामना संपल्यानंतर मोहम्मद सिराजची एक वेगळाच स्टाईल पाहायला मिळाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जसप्रीत बुमराहची गोलंदाजी पाहून मोहम्मद सिराजही त्याचा चाहता झाला. सामना संपल्यानंतर जेव्हा खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा सिराजनं बुमराहला वाकून आदरानं अभिवादन केलं. सिराजचा असं करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हयरल झाला. सिराजनं अभिवादन केल्यानंतर बुमराहनं त्याची गळाभेट घेतल्याचं व्हिडिओत दिसतंय. तुम्ही हा व्हिडिओ खाली पाहू शकता.

 

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपल्या शानदार कामगिरीनं अनेक विक्रम रचले आहेत. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीविरुद्ध एका डावात 5 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय. याशिवाय त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबीच्या सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. बुमराहने आतापर्यंत आरसीबीविरुद्ध आयपीएलच्या 19 सामन्यांमध्ये 29 बळी घेतले आहेत. एवढेच नाही तर आयपीएलमध्ये दोनदा एका डावात 5 बळी घेणारा तो मुंबई इंडियन्सचा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी जेम्स फॉल्कनर, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी ही कामगिरी केली होती.

मागील वर्षी पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला होता. यंदा मात्र तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये त्यानं 10 विकेट घेतल्या आहेत. या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही तो अव्वल क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मयंक यादव आयपीएलच्या किती सामन्यांमधून बाहेर राहणार? कोच जस्टिन लँगरनं दिलं फिटनेस अपडेट

एकाच डावात तिघांची अर्धशतकं अन् तिघे शून्यावर बाद! आरसीबी पराभवातही रेकॉर्ड बनवते

“नाहीतर मी कॅनडाकडून खेळण्याचा प्रयत्न केला असता”, जसप्रीत बुमराहचा धक्कादायक खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---