आयपीएल (IPL 2024) मध्ये धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघासाठी एक वाईट बातमी आहे. या वर्षीचा त्यांचा प्रमुख गोलंदाज मयंक यादव याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो जवळपास एक आठवडा आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. या एका आठवड्यात तो कमीत-कमी दोन सामन्यांना मुकणार आहे.
आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामना फिरवणारा मयंक यादव याला गुजरात टाइटन्स विरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. यामुळे त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. त्यानं सामन्यात फक्त एक षटक गोलंदाजी केली. आता मयंकच्या कामाचा भार कमी करण्यासाठी त्याला आराम दिला जाणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचे सीईओ बिष्ट यांनी सागितलं की, “मयंक यादवला पोटाच्या खालच्या भागात वेदना जाणवत आहेत. यामुळे त्याला एक आठवडा आराम दिला जाणार आहे. या दरम्यान त्याच्या कामाचं व्यवस्थापन केलं जाईल. आम्हाला आशा आहे की, मयंक लवकरच बरा होऊन मैदानात उतरेल.”
लखनऊ सुपर जायंट्सचा पुढील सामना 12 एप्रिलला एकाना स्टेडिअमवर दिल्ली कॅपिटल विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 14 एप्रिलला ते कोलकाता नाईट राइडर्सविरुद्ध ईडन गार्डनवर खेळायला उतरतील. या दरम्यान मयंक यादव जर एक आठवडा संघा बाहेर राहिला तर तो आगामी दोन्ही सामने खेळू शकणार नाही.
मयंक यादवनं लखनऊ सुपर जायंट्ससाठी आतापर्यंत गोलंदाजीत चांगलं प्रदर्शन केलं आहे. त्यानं 3 सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. मयंक जर दुखापतीतून लवकर बरा झाला नाही, तर लखनऊसाठी हे चांगले संकेत नाहीत. आयपीएलच्या या हंगामात सर्वात वेगवान चेंडू (ताशी 156.7 किमी) टाकण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
चेन्नई सुपर किंग्ज विजयी ट्रॅकवर परतली, कोलकाताचा हंगामातील पहिला पराभव
रवींद्र जडेजाचा आयपीएलमध्ये अनोखा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
आरसीबीच्या प्रशिक्षकानं सांगितलं राजस्थानविरुद्धच्या पराभवाचं कारण; म्हणाले, “आम्हाला 200 धावा….”