---Advertisement---

ज्या खेळाडूसाठी धोनी निवडसमितीशी भांडला, त्यानेच धोनीला…

On: गुरूवार, एप्रिल 30, 2020 5:17 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंगला भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा अत्यंत जवळचा मित्र मानले जाते. धोनीची सुरेश रैना आणि सिंगबरोबर खूप चांगली मैत्री आहे.

सिंगने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे काही सामने धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळले आहेत. परंतु बाकी सर्व सामने त्याने अनिल कुंबळे, द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. तो क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा खेळाडू आहे.

असे असले तरी सिंगने (R.P. Singh) धोनी नाही तर फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) सर्वोत्तम कर्णधार असल्याचे सांगितले आहे. सिंग म्हणाला की, त्याने जरी कुंबळेच्या नेतृत्वात केवळ ६ कसोटी सामने खेळले आहेत. परंतु यादरम्यान त्याला कुंबळेचे नेतृत्व फार आवडले आहे.

त्याने कुंबळेच्या आणि राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वातील फरकदेखील सांगितला. याबरोबरच त्याने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाचीदेखील प्रशंसा केली.

कुंबळेची प्रशंसा करत सिंग म्हणाला की, , “कुंबळे स्वत: एक गोलंदाज होता. तसेच तो माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कर्णधार होता. मी त्याच्या नेतृत्वात फार कमी सामने खेळलो. परंतु तो एक गोलंदाजाची मानसिकता समजून घेत होता. जर मी इन स्विंगबद्दल विचार करत होतो, तेव्हा कुंबळे म्हणत असे की, ‘नाही यावेळी आऊट स्विंग टाकण्याची आवश्यकता आहे.’ द्रविड असा करत नव्हता. कारण तो एक फलंदाज होता.”

सिंगने यावेळी गांगुलीची (Sourav Ganguly) प्रशंसा केली. तो म्हणाला की, कठीण परिस्थितीत गांगुली आपल्या खेळाडूंना पाठिंबा देत होता. याबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला की, “सर्व कर्णधारांची आपली एक पद्धत आहे. गांगुलीने मला नवीन चेंडू दिला आणि म्हणाला होता की, जा गोलंदाजी कर. माझा पहिला आणि दुसरा चेंडू वाईड गेला होता. त्यानंतर तो म्हणाला की, असे सर्वांबरोबर होते. गांगुली असा कर्णधार होता जो नेहमी खेळाडूंना पाठिंबा देत होता.”

सिंगच्या कारकीर्दीमध्ये धोनीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. असे म्हटले जाते की, धोनी सिंगच्या निवडकर्त्यांशी वाद घातला होता. २००७मध्ये भारतीय संघाला टी२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सिंगला २००८मध्ये संघातून बाहेर करण्यात आले होते. यानंतर धोनीने त्याला संघात आणण्यासाठी निवडकर्त्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर सिंगने संघात पुनरागमन केले होते. परंतु त्याला चांगली कामगिरी करता नाही आली.

धोनी आणि सिंगची घनिष्ठ मैत्री होती. धोनीच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये सिंगची उपस्थिती असायची. यामध्ये धोनीने जेव्हा हमर गाडी घेतली होती. तसेच त्याने नवीन घर बांधले होते आणि धोनीच्या लग्नातदेखील सिंग उपस्थित होता. यावरून आपण त्यांच्या मैत्रीचा अंदाज घेऊ शकतो.

वाचनीय लेख-

-त्यांचा स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही परंतु रोहितला मात्र त्यांनी घडवले

-रोहित शर्माकडे एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, अशी भागवायचा गरज

-खेळाडू म्हणून ५ पैकी ५ आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---