मुंबई । वयाच्या 16 नसीम शहाने पाकिस्तान क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून आईचे स्वप्न पूर्ण केले. पण आपल्या मुलाचं हे मोठे यश पाहण्यासाठी नसीमची आई या जगात नव्हती. नसीमच्या आईचे जेव्हा निधन झाले तेव्हा तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सामना खेळत होता.
आईचे निधन झाल्यानंतरही त्याने दौऱ्यातून माघारी न येता हिंमत धरून राहिला आणि पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण केले. मृत्यूसमयी नसीम तिच्याजवळ नव्हता याचे दुःख आजही त्याला आहे. आईच्या निधनानंतर होणार्या पहिल्या ईद च्या वेळी तिचे दर्शन घेण्यासाठी तो कब्रस्तानमध्ये पोहचला.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नसीम शहाच्या आईचे निधन झाले होते. त्यावेळी नसीम ऑस्ट्रेलिया दौर्यावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध सराव सराव सामना खेळत होता. या दुःखद घटनेनंतर पाकिस्तानच्या संघाने हातावर काळीपट्टी बांधून मैदानात उतरला होता.
त्यासोबत ऑस्ट्रेलियाच्या संघाने देखील ट्विट करून नसीमच्या आई बद्दल शोक व्यक्त केला होता. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील काळीपट्टी बांधून मैदानात खेळण्यासाठी उतरले होते. त्यानंतर 21 नोव्हेंबरला नसीम पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.
https://twitter.com/mdk_gul/status/1264436348695519233
आईच्या निधनानंतर तब्बल एक महिन्यानंतर नसीमने कराची येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. कराची कसोटीमध्ये त्याने दुसऱ्या डावात 5 बळी घेत आपल्या संघाला 263 धावांनी विजय मिळवून दिला. त्यांचीही कामगिरी तो त्याच्या आईला समर्पित करणार होता, पण त्यापूर्वीच आईचे निधन झाले होते. नसीम शहाने पाकिस्तानकडून आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत त्यात त्याने एकूण 13 बळी घेतले आहेत.






