---Advertisement---

महान फलंदाज माहेला जयवर्धने होणार पुन्हा कर्णधार!

On: गुरूवार, जून 21, 2018 9:41 AM
---Advertisement---

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन उत्कृष्ठ फलंदाज महेला जयवर्धनेची मेरीलिबोन क्रिकेट क्लबच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

29 जुलैपासून इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर नेपाळ आणि ब्रिटेनच्या मैत्री संबधांना 200 वर्षे पूर्ण होत असल्याने मेरीलिबोन क्रिकेट क्लब, नेपाळ आणि नेदरलॅन्ड्स यांच्यात टी-20 तीरंगी मालिका आयोजित केली आहे.

सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून जयवर्धनेने 25000 पेक्षा धावा केल्या आहेत. याचा सन्मान म्हणून जयवर्धनेला मेरीलिबोन क्रिकेट क्लबचे 2015 साली अाजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जयवर्धने जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये खेळला आहे. तसेच बीग बॅश लीग आणि आयपीयलमध्ये त्यानी प्रशिक्षकाचीही भूमिका पार पाडली आहे.

या तिरंगी मालिकेसाठी उर्वरीत मेरीलिबोन क्रिकेट क्लबचा संघ मालिकेपूर्वी जाहिर करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आपण जर क्रिकेट फॅन असाल तर ही आहे आपल्यासाठी महत्त्वाची बातमी

-वनडेत ५०० धावांचा पाठलाग करताना मला विराटला पहायचं आहे!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment