fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…

cricket-news-22-september-2020

September 22, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ KKRiders

Photo Courtesy: Twitter/ KKRiders


1. आयपीएलच्या 13व्या हंगामातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत केलं आहे. आरसीबीनं दिलेल्या 164 धावांच्या आव्हानात हैदराबादचा संघ 19.4 षटकांत 153 धावांवर बाद झाला.  आरसीबीच्या विजयाचा नायक फिरकीपटू युजवेंद्र चहल होता. त्यानं 18 धावा देऊन 3 बळी घेतले. म्हणून चहलला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. आरसीबीकडून एबी डिविलियर्स आणि देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतकी खेळी केली

2. सोमवारी सनराइज हैदराबाद आणि रॉयल चॅलेजर्स बंगळूर यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या संघानं विजय मिळवला. या विजयासह लीगमधील एका संघासाठी 50 सामने जिंकणारा विराट कोहली चौथा कर्णधार ठरला. त्यांच्या आधी, एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्ज, गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून 50 हून अधिक सामने जिंकले आहेत. धोनी सीएसकेसाठी 100 सामने जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.

3. आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईन यापूर्वीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवून आयपीएलमध्ये आपला पहिला विजय मिळाला होता, तर राजस्थान रॉयल्स आपला पहिला सामना आज खेळता आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव स्मिथ फिट असून तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. दुसरीकडं चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.

4. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात हाताला दुखापत झाली होती. ही दुखापत आता बरी झाली असून तो पुढच्या सामन्यात खेळू शकेल, अशी आशा आर अश्विननं ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. किंग्स इलेवन पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्यानं एका षटकात दोन धावा देत दोन महत्त्वपूर्ण गडी बाद करत सामना दिल्लीच्या बाजूला फिरवला होता.

5. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराइज हैद्राबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैद्राबादचा पराभव झाला.  या सामन्यात अष्टपैलू विजय शंकर हा पूर्णपणे फ्लॉप ठरला. फलंदाजी करताना तो शून्यावर बाद झाला तर गोलंदाजीत देखील तो महागडा ठरला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर मिल्सचा पाऊस पडला. विश्वचषकाच्या वेळी संघ निवडताना अंबाती रायडूऐवजी विजय शंकरला पसंती दिल्यानं निवड समितीवर देखील जोरदार टीका झाली होती.

6. 24 सप्टेंबरला फिट इंडिया मोहिमेला एक वर्ष पूर्ण होताहेत. त्यानिमित्तानं  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी ऑनलाईन ‘फिट इंडिया’ संवादात फिटनेससाठी लोकांवर प्रभाव पाडणार्‍या लोकांशी संवाद साधतील. त्यामध्ये विराट कोहली, मिलिंद सोमण आणि रुजुता स्वेकर यांचा समावेश आहे. कोविड -19 च्या काळात फिटनेस हा जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू बनला आहे. त्यामुळं या संवादात, पोषण, आरोग्य आणि तंदुरुस्तीवर चर्चा केली जाईल.

7. कोलकाता नाइट रायडर्सचा पुढचा सामना गतविजेते मुंबई इंडियन्स संघाशी होणार आहे. या सामन्यात केकेआरचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्यात येणार असल्याचं संकेत प्रशिक्षक ब्रॅडन मॅक्युलम यांनी यावेळी दिलं. तर ऑयन मॉर्गन हा चौथ्या क्रमांकावर खेळेल आणि तसेच तो कर्णधार दिनेश कार्तिक याला तो मैदानावर मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

8. अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शला सोमवारी आरसीबी विरुद्धच्या  सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना घोट्याला दुखापत झाली. डावाच्या पाचव्या षटकात गोलंदाजी करत असतांना 28 वर्षीय मार्शच्या दुखापत झाल्यामुळं तो मैदानातून बाहेर गेला. अष्टपैलू विजय शंकरनं त्याच्या षटकातील उर्वरित दोन चेंडू फेकले. फक्त चार चेंडू फेकणारा मार्श यापूर्वीही दुखापतीमुळं त्रस्त झाला होता. यामुळं तो आयपीएलच्या अनेक स्पर्धांमध्ये खेळला नाही.


Previous Post

५ असे खेळाडू, जे आयपीएलमध्ये झालेत सर्वाधिक वेळा रनआऊट

Next Post

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची ‘ही’ आहेत ५ कारणे, घ्या जाणून…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/Sunrisers

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची 'ही' आहेत ५ कारणे, घ्या जाणून...

Photo Courtesy: www.iplt20.com

आयपीएल जिंकण्याच्या केकेआरच्या शक्यता वाढल्या, कारणही आहे तसंच खास

Photo Courtesy: www.iplt20.com

असा फॅन कधी पाहिलाही नसेल! टीव्हीसमोरच 'या' खेळाडूची केली आरती

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.