जुलै अखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या माजी अनुभवी गौतम गंभीरने अलीकडेच सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर भर दिला आहे. गौतमचा बीसीसीआयसोबत 31 डिसेंबर 2027 पर्यंत करार आहे. आणि त्याचं पहिलं आव्हान याच महिन्यात सुरू होणार आहे. स्टार-स्पोर्ट्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गंभीरने खेळाडू व्यवस्थापन आणि निवडीबाबत आपली प्रतिक्रया जाहीर केली आहे.
गंभीर म्हणाला की, माझा पूर्ण विश्वास आहे की, जर तुम्ही चांगले (तंदुरुस्त) असाल तर तुम्ही सर्व फॉरमॅटमध्ये खेळले पाहिजे. दुखापतींच्या व्यवस्थापनावर माझा कधीच फारसा विश्वास नव्हता. जर तुम्हाला दुखापत झाली तर तुम्हाला त्यातून सावरावे लागेल. माजी डावखुरा फलंदाज म्हणाला की तु्म्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहात जर तुम्ही चांगले असाल आणि तुम्ही आघाडीच्या खेळाडूंना विचाराल तर त्यांना तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे. त्याच वेळी, गौतम वर्कलोड मॅनेजमेंटवर सतत खेळण्याच्या कल्पनेला महत्त्व देतो. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तरी त्यातून सावरावे आणि वर्कलोड मॅनेजमेंटसाठी एकच फॉरमॅट न निवडता सर्व प्रकारचे क्रिकेट खेळावे, अशी गंभीरची विचारधारा आहे.
गौतम म्हणाला की, दुखापती हा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळत असाल आणि तुम्हाला दुखापत झाली असेल, तर परत जा, रिकव्हरी प्रक्रियेवर काम करा, पण तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळले पाहिजेत. तो म्हणाला की, तुम्ही एखाद्या विशिष्ट खेळाडूला ओळखता आणि मग त्याला वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी राखून ठेवा, या कल्पनेचे मी अजिबात समर्थन करत नाही. आम्ही खेळाडूंचे तपशील, दुखापती, वर्कलोड मॅनेजमेंट आणि इतर सर्व काही व्यवस्थापित करणार आहोत.
या विधानाद्वारे, गौतमने हार्दिक पांड्यासह इतर खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे की, यापुढे जुने धोरण चालणार नाही. आता तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या मनाप्रमाणे फॉरमॅट खेळता येईल असे चालणार नाही. एकप्रकारे गौतमने पांड्याला स्पष्ट संदेश दिला आहे की, जर तू तंदुरुस्त असाल तर तुला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघासाठी सर्वोत्तम योगदान द्यावे लागेल.
महत्तवाच्या बातम्या-
कांगारूंना घेतलं धारेवर; ऑस्ट्रेलिया-युवराज सिंग जुनं नातं, वर्षे बदलली पण ‘सिक्सर किंग’ मात्र तोच
टी20 विश्वचषक 2007 ची पुनरावृत्ती? भारत विरुद्ध पाकिस्तान होणार फायनल, जाणून घ्या कधी रंगणार अंतिम सामना
अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिकने अनन्या पांडेसोबत धरला ठेका, व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ