---Advertisement---

IPL 2025: द्रविड नाही, गौतम गंभीरचा मित्र बनणार केकेआरचा नवा मार्गदर्शक!

On: शुक्रवार, जुलै 12, 2024 2:35 PM
---Advertisement---

गाैतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर आयपीएलमध्ये केकेआर संघातील मेंटाॅर पदाची जागा रिक्त झाली आहे. वास्तविक, बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाच्या हेड कोचसाठी गाैतम गंभीरची नियुक्ती केली होती. मुख्य प्रशिक्षक म्हणून गाैतम गंभीर भारतीय संघाची धुरा 26 जुलै पासून स्वीकारणार आहे. गंभीर श्रीलंकेविरुद्ध आपल्या प्रशिक्षकाच्या कार्यकाळाला सुरुवात करेल. त्यामुळे गंभीरला केकेआर मधील मेंटाॅर पदी राहता येणार नाही. तर आश्या स्थितीत केकेआरला नव्या मेंटाॅरची गरज आहे. तर या पदासाठी गंभीरच्या जुन्या मित्रांचे नाव समोर येत आहे. जो 2012 आणि 2014 मधील आयपीएल विजेत्या केकेआर संघाचा भाग होता.

मधल्या काळात राहुल द्रविड केकेआर संघामध्ये गाैतम गंभाीरचा रिप्लेसमेंट होऊ शकतो. आश्या बातम्या होत्या. परंतु वृत्त अहवालनुसार केकेआर संघ व्यवस्थापन मेंटाॅर पदासाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॅक कॅलिसशी संपर्क साधला आहे. वास्तविक जॅक कॅलिसने आयपीएल खेळले आहे. तो एक खेळाडू म्हणून गाैतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल खिताब जिंकला होता. याव्यतिरिक्त कॅलिसने 2015 मध्ये ते केकेआरचे फलंदाजी सल्लागार देखील होते. आणि ट्रेवर बेलिस यांनी मुख्य प्रशिक्षक पदावरून पायउतार झाल्यानंतर कॅलिसची केकेआरचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

द टेलिग्राफीच्या एका वृत्तामध्ये असे सांगितले आहे की, गंभीर भारतीय क्रिकेट संघात हेड कोच म्हणून सामिल झाल्यानंतर, जॅक कॅलिस केकेआरच्या कोचिंग स्टाफमध्ये पुनरागमन करु शकतो. रिपोर्ट मध्ये असे म्हटंले आहे की, केकेआरच्या मेंटाॅर पदासाठी जॅक कॅलिसचे नाव समोर आहे. ज्याने 2019 मध्ये केकेआरला मार्गदर्शन दिले होते.  फ्रैंचाइजी गाैतम गंभीरच्या रिप्लेसमेंटच्या शोधात आहे.

महत्तवाच्या बातम्या-

ऑलिम्पिकमध्ये भारत पाकिस्तानपेक्षा किती पुढे? दोन्ही देशांनी आतापर्यंत किती पदकं जिंकली? जाणून घ्या
“तर विराट भारतालाही विसरेल…”, शाहिद आफ्रिदीने कोहलीबद्दल केले मोठे वक्तव्य
जेम्स अँडरसनने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---