टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने नुकतेच त्याची ऑलटाईम आयपीएल प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या संघात त्यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनीसह 7 भारतीयांना ठेवले असून 4 विदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे. दरम्यान अश्विनने त्याच्या सर्वकालीन आयपीएल प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची नव्हे तर एमएस धोनीची निवड केली आहे. या दोन्ही महान खेळाडूंनी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी विक्रमी 5-5 विजेतेपद जिंकले आहेत.
आर अश्विनने त्याच्या सर्वकालीन आयपीएल इलेव्हनमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. विराट कोहली 8004 धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तर हिटमॅन रोहित शर्मा 6628 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली हा 8 शतकांसह आयपीेएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. हे दोन्ही स्टार खेळाडू सलामीवीर म्हणून कहर करू शकतात.
अश्विनने ‘मिस्टर आयपीएल’ आणि ‘चिन्ना थाला’ या नावांनी प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाला आपल्या संघात तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. सीएसकेला यशस्वी संघ बनवण्यात रैनाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि या स्थानावर त्याने चेन्नईसाठी अनेक अप्रतिम खेळी खेळल्या आहेत.
अश्विनने चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला तर टी20 फॉर्मेटमधील सध्याचा सर्वात धोकादायक फलंदाज आणि एबी डिव्हिलियर्सला पाचव्या क्रमांकावर ठेवले आहे. आर अश्विनने एमएस धोनीला त्याच्या सर्वकालीन प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार आणि यष्टिरक्षक म्हणून निवडले आहे आणि त्याला 6 व्या क्रमांकावर ठेवले आहे. डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा करणे असो किंवा सर्वाधिक षटकार मारणे असो, माहीचे नाव प्रत्येक यादीत अव्वल खेळाडूंमध्ये दिसेल. तर विकेटच्या मागे त्याचा वेग पाहून सगळेच प्रभावित झाले आहेत.
अश्विनने आपल्या संघात दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. फिरकीपटू म्हणून त्याने अफगाणिस्तानचा रशीद खान आणि वेस्ट इंडिजचा सुनील नारायण यांचा समावेश केला आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये त्याने भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांच्यासह लसिथ मलिंगाची निवड केली आहे.
आर अश्विनचा सर्वकालीन आयपीएल इलेव्हन- रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी, रशीद खान, सुनील नारायण, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला धक्का; धडाकेबाज क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा
राष्ट्रीय क्रीडा दिन: काय आहे इतिहास, का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या एका क्लिकवर
हृदयात छिद्र होतं! भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला करावी लागली चक्क हार्ट सर्जरी