टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. ज्यामध्ये रोहितची फलंदाजीही चांगली होती. रोहितसोबत विराट कोहलीही टीम इंडियासाठी आतापर्यंत महत्त्वाचा ठरला आहे. त्याने असे अनेक विक्रम केले आहेत, जे कोणत्याही फलंदाजाला तोडणे सोपे नाही. यशस्वी जयस्वाल आता हा वारसा पुढे नेऊ शकतो. या तिन्ही खेळाडूंना 2024 वर्षाचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. यशस्वीला वर्षातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे.
वास्तविक, सीएट क्रिकेट अवॉर्ड्स 2024 दरम्यान, रोहित, कोहली आणि यशस्वी यांना हा किताब देण्यात आला. रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले. यशस्वीची वर्षातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून निवड झाली. विराटची वनडे बॅटर ऑफ द इयर निवड झाली. या अवॉर्ड शोमध्ये टीम इंडियाच्या आणखी खेळाडूंना खिताब देण्यात आले. मोहम्मद शमीची वर्षातील सर्वोत्तम वनडे गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. या शोमध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरही सहभागी झाला होता.
टी20 विश्वचषकाच्या यशानंतर विराट आणि रोहितने या फाॅरमॅटच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र दोघेही देशांतर्गत टी20 लीग सामने खेळणार आहेत. रोहितने भारतासाठी 159 टी20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 4231 धावा केल्या आहेत. रोहितने टीम इंडियासाठी टी20 मध्ये 5 शतके आणि 32 अर्धशतके झळकावली आहेत. विराटबद्दल बोलायचे झाले तर त्याने भारतासाठी 125 टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 38 अर्धशतकांच्या जोरावर 4188 धावा केल्या.
टीम इंडियाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अनेक वेळा शानदार गोलंदाजी करत आपली कला दाखवू दिला आहे. शमीने भारतासाठी 101 वनडे सामने खेळले आहेत.ज्यामध्ये त्याने 195 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च कामगिरी 7/57 अशी आहे. तर शमीने भारताकडून 23 टी20 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. यानंतर 64 कसोटी सामन्यात त्याने 229 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा-
ऍशेस की बॉर्डर-गावस्कर, कोणती मालिका मोठी? कांगारू गोलंदाजाने दिले आश्चर्यकारक उत्तर
भारत-पाकिस्तान यांच्यात 18 वर्षांनंतर होणार कसोटी सामना! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
53 वर्षात केवळ 12 द्विशतक; वनडेमध्ये हा विश्वविक्रम करणारे चक्क इतके भारतीय खेळाडू