श्रीलंका दौऱ्यावर पोहोचलेली टीम इंडिया टी20 मालिकेत यजमान संघाचा पराभव केल्यानंतर वनडे मालिकेत यजमान संघाचा पराभव करण्यासाठी सज्ज झाली आहे. 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून (2 ऑगस्ट) सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीवर असतील. तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात विराट कोहलीची कोलंबो स्टेडियमधील कशी आहे.
विराट कोहली कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमध्ये (वनडे सामन्यात)
सामने – 10
धावा – 644
सरासरी – 107.33
स्ट्राइक रेट – 98.47
शतक- 4
टीम इंडियाच्या 35 वर्षीय अनुभवी फलंदाज विराटने कोलंबोमध्ये आतापर्यंत एकूण 10 सामने खेळला आहे. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 107.33 च्या सरासरीने 644 धावा झाल्या आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या दऱ्यान त्याने 4 उत्कृष्ट शतकेही झळकावली आहेत.
विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील बहुतांश सामने श्रीलंकेविरुद्ध खेळले आहेत. विरोधी संघाविरुद्धच्या 53 सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 51 डावांमध्ये 63.26 च्या सरासरीने 2594 धावा झाल्या आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये 10 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत.
विराट कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने देशासाठी आतापर्यंत एकूण 292 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, त्याने 280 डावांमध्ये 58.67 च्या सरासरीने आपल्या बॅटने 13848 धावा केल्या आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये कोहलीच्या नावावर 50 शतके आणि 72 अर्धशतके आहेत.
किंग कोहलीने आतापर्यंत भारतासाठी एकूण 530 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, त्याच्या बॅटने 191 कसोटी क्रिकेट डावांमध्ये 49.15 च्या सरासरीने 8848 धावा, 280 एकदिवसीय डावात 58.67 च्या सरासरीने 13848 धावा आणि 117 टी20 डावात 48.69 च्या सरासरीने 4188 धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकाच्या यशानंतर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.
हेही वाचा-
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेतच पावासाचं सावट? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोलंबोमधील हवामान कसे असेल
मोठी बातमी! ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूचा पॅरिसमध्ये कार अपघात, कुटुंबीयही होते सोबत
चॅम्पियन्स ट्राॅफीची पायाभरणी! श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेला आजपासून सुरुवात, रोहित-विराट जोडी पुन्हा ॲक्शनमध्ये