इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच (IPL) मध्ये अनेक वेळा लिलाव करणारे प्रसिद्ध लिलावकर्ता ह्यू एडमीड्स यांनी भारतीय फलंदाज विराट कोहलीबाबत मोठा दावा केला आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा विराट कोहली लिलावात उतरला तर त्याला 30 कोटींहून अधिक रुपये सहज मिळू शकतात, असे ह्यू ॲडम्सने सांगितले आहे. विराट कोहली त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे आणि आरसीबी त्याला सतत्याने कायम राखत आहे.
विराट कोहली आतापर्यंत लिलावात सहभागी झालेला नाही. आयपीएल 2008 मध्येही त्याला आरसीबीने अंडर-19 ड्राफ्टमध्ये घेतले होते. तेव्हापासून तो आरसीबीकडून सतत्याने खेळत आहे आणि फ्रँचायझी त्याला कायम ठेवत आहे. 17 हंगामात संघाला एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही, तरीही संघाने विराट कोहलीवर विश्वास कायम ठेवला आहे. आरसीबी कोणत्याही खेळाडूला कायम ठेवू शकतो किंवा ठेवू शकत नाही, पण विराटला ते नक्कीच कायम ठेवतात. आता आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबी विराटला कायम ठेवणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
अरविंद कृष्णन यांच्याशी संवाद साधताना ह्यू ॲडम्स म्हणाले की, जर विराट कोहली लिलावात उतरला तर त्याला 30 कोटींहून अधिक रुपये सहज मिळू शकतात. तो पुढे म्हणाला, “विराट कोहलीला लिलावात सादर करणे हा सर्वात मोठा सन्मान असेल. किमतीचा विचार करता, मला वाटते की त्याला 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळेल.” विराट कोहली सध्या आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. लीगच्या इतिहासात 8000 धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. विराटने 38.67 सरासरीने 132 च्या स्ट्राइक रेटने जवळपास 8004 धावा केल्या आहेत. विराटने या स्पर्धेच्या इतिहासात 7 शतके आणि 55 अर्धशतके ठोकली आहेत.
हेही वाचा-
स्टार फिरकीपटू भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटी मालिका खेळणार का नाही? क्रिकेट बोर्डाने स्पष्टचं सांगितले
आधी जिवलग आता कट्टर प्रतिस्पर्धी! रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार
आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्स या 4 खेळाडूंना ठेवणार कायम, परदेशी दिग्गजांचाही समावेश